रत्नागिरीत क्वालिस-कंटेनरचा अपघात, एक महिला जागीच ठार - रत्नागिरी अपघात बातमी
गोरेगांव(मुंबई)हून सिंधुदुर्गला एक क्वालीस ( एम. एच. ०४- ए. वाय. ८०८८) निघाली होती. मुंबई गोवा महामार्गावर संगमेश्वर जाखमाता मंदिरनजीक या क्वालिसची समोरुन येणाऱ्या कंटेनरला जोरदार धडक बसली. या अपघातात क्वालिसमधील सीमा पडवळ (वय ५६ रा. गोरेगांव) मुंबई या जागीच ठार झाल्या तर जगदीश पडवळ (वय ६०), सौरभ पडवळ (वय २५) दोन्ही रहाणार गोरेगांव, मुंबई हे गंभीर जखमी झाले.
रत्नागिरीत क्वालिस-कंटेनरचा अपघात, एक महिला जागीच ठार
रत्नागिरी -मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वर येथे झालेल्या एका भीषण अपघातात एक महिला जागीच ठार झाली असून दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. आज (रविवार) सकाळी संगमेश्वर जाखमाता मंदिरानजीक क्वालिस आणि कंटेनर या दोन वाहनांमध्ये समोरासमोर हा अपघात झाला.
Last Updated : Jul 12, 2020, 1:16 PM IST