महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Nilesh Rane On Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे म्हणाले त्यात शंभर टक्के तथ्य - निलाश राणे

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे बोलले त्यात शंभर टक्के तथ्य असणार आहे, असे भाजपा प्रदेश सचिव निलेश राणे यांनी म्हटले आहे. त्यांच्यामागे काय कट रचला गेला हे काही दिवसांनी कळेलच असेही ते म्हणाले. तसेच महाविकास आघाडीची नीच प्रवृत्तीची लोकं, पोट निवडणूक लढणावर अशी टीका देखील त्यांनी विरोधकांवर केली.

Nilesh Rane, BJP State Secretary
निलेश राणे, भाजपा प्रदेश सचिव

By

Published : Jan 25, 2023, 10:13 PM IST

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे म्हणाले त्यात शंभर टक्के तथ्य - निलाश राणे

रत्नागिरी :उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे बोलले त्यात शंभर टक्के तथ्य असणार, त्यांच्यामागे काय कट रचला गेला हे काही दिवसांनी कळेलच असं माजी खासदार, भाजपा प्रदेश सचिव निलेश राणे यांनी म्हटलं आहे. ते आज रत्नागिरीत बोलत होते. महाविकास आघाडीच्या काळात मला अटक करण्याचा प्रयत्न होता, देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यावर निलेश राणे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

उद्धव ठाकरेंना धडा :यावेळी निलेश राणे म्हणाले की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काहीतरी माहिती असल्यामुळे त्यांनी असं वक्तव्य केलं आहे. ते कधीच हवेत गोळीबार करत नाहीत. अडीच वर्षे महाविकास आघाडीने याला अडकव त्याला अडकव हेच काम केले. कोरोनामध्ये चोरी करायची आणि मोठ्या नेत्यांना अडकवायचे हीच ठाकरे सरकारची कामे होती. पण मुख्यमंत्रीपद त्यांच्या पायाखालून कधी गेले हे त्यांना कळलं नाही. नियतीने उद्धव ठाकरे यांना धडा शिकवला अशीही टीका निलेश राणे यांनी यावेळी केली.

महाविकास आघाडी माणुसकी शून्य :पुण्यातील पोट निवडणुकीबाबत ते म्हणाले की, महाविकास आघाडीची नीच प्रवृत्तीची लोकं, ते पोट निवडणुकीची जागा लढवणार. महाविकास आघाडीला माणुसकी नाही. अंधेरीची पोट निवडणूक भाजपने लढवली नव्हती असे सांगत निलेश राणे यांनी मनसेच्या वांजळे यांच्या पोटनिवडणुकीची यावेळी आठवण करून दिली. महाविकास आघाडीत माणुसकी शून्य आहे. साम-दाम-दंड-भेद करून महाविकास आघाडी या निवडणूक रिंगणात उतरणार तसेच महाविकास आघाडीचे नेते खालच्या दर्जाचं राजकारण करतात अशी टीका त्यांनी यावेळी केली.

आदित्य ठाकरेंनी गार्डनची उद्घाटन करावे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौऱ्यावरून टीका करणाऱ्या आदित्य ठाकरे यांना देखील निलेश राणे यांनी यावेळी प्रत्युत्तर दिलं आहे. दावोसमध्ये मुख्यमंत्री उशिरा का पोहोचले, हे पाहण्यासाठी आदित्य ठाकरे काय दरवाजावरती उभे होते का ? असे म्हणत राणे आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. तसेच आदित्य जेव्हा दाओसला गेले, त्यानंतर ते पंधरा दिवस लंडनला गेले होते. मुख्यमंत्री शिंदे साहेब तीन दिवसांमध्ये मुंबईत परत आले. पण आदित्य दौऱ्यानंतर पंधरा दिवसानंतर मुंबईत परत आले. दावोसनंतर आदित्य ठाकरे पंधरा दिवस लंडनला काय करत होते ? असा सवाल करत राणे यांनी आदित्यने हाय लेवलच्या गोष्टी करू नयेत, त्यांनी मुंबईतल्या गार्डनची उद्घाटनाची कामे करावीत असा टोला लगावला.

कणकवलीतला राडा पूर्वनियोजित :कणकवलीतील शिंदे गट - ठाकरे गट राडा प्रकरणी निलेश राणे म्हणाले की, आमदार वैभव नाईक यांच्यासोबत कार्यकर्ते नव्हते. वैभव नाईक पोलिसांना बघून हातात दांडा घेऊन समोर गेले. पुढे जाऊन पोलिस वाले थांबवणार हे कळल्यानंतर वैभव नाईक हातात दांडा घेऊन गेले होते. कणकवली राड्यात कट रचला गेला, यात गोट्या सावंत यांचा जीव गेला असता. कणकवलीतला राडा पूर्वनियोजित होता असेही निलेश राणे यावेळी म्हणाले. तसेच वैभव नाईक पळकुटा आमदार असून 2024 नंतर तो आमदार म्हणून दिसणार नाही अशीही टीका राणे यांनी यावेळी केली.


हेही वाचा -Theater Book For Pathan : SRK चाहत्याचा नादच खुळा; पठाण चित्रपट पाहण्यासाठी चक्क अख्ये थिएटर बुक

ABOUT THE AUTHOR

...view details