रत्नागिरी- रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा शहरात एनआरसी, एनपीआर आणि सीएए विरोधात सोमवारी (दि. 27 जानेवारी) मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चादरम्यान 70 वर्षाच्या कादर अहमद नाईक यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
शेटे चौक ते तहसलीदार कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला होता. सर्वपक्षीयांनी काढलेल्या मोर्चात 3 हजारपेक्षा जास्त लोक सहभागी झाले होते. मोर्चादरम्यान वृद्धाचा मृत्यू झाल्याने तहसीलदारांना निवेदन देत मोर्चा थांबवण्यात आला.