रत्नागिरी-जिल्ह्यात बुधवारी कोरोनाचे ५२५ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या कडक लॉकडाऊनचा कोणताच परिणाम रुग्णसंख्या रोखण्यासाठी झालेला दिसत नाही. जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बुधवारी ८ तर गेल्या काहि दिवसात २१ रुग्णांचा मृत्यू झाला. तर एकूण २९ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे जिल्हा रुग्णालयाने जाहिर केले आहे. त्यामुळे एकूण मृत्यूच्या संख्येने १४२८ एवढा आकडा गाठला आहे.
बुधवारी कोरोनाचे ५२५ नवे रुग्ण, तर २९ मृत्यूची नोंद
रत्नागिरी जिल्ह्यात रुग्णांच्या एकूण मृत्यूची संख्या १४२८ झाली असून मृत्यूचा दर ३.४२ टक्के झाला आहे. तर पॉझिटिव्ह रुग्णांचा दर १७.६८ पर्यंत पोहचला आहे.
बुधवारी ५२५ नवे रुग्ण
बुधवारी जिल्ह्यात ४ हजार १४ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ५२५ पॉझिटिव्ह तर ३ हजार ४८९ नागरीकांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आतापर्यंत १ लाख ९४ हजार १८२ नागरीकांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर ४१ हजार ७२१ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. बुधवारी ३२७ रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर आतापर्यंत ३५ हजार ७४५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ४५४८ रुग्ण जिल्ह्यातील विविध रुग्णालयातून उपचार घेत आहेत.
२९ मृत्यूंची नोंद
बुधवारी दिवसभरात ८ तर यापुर्वी २१ रुग्णांचा मृत्यू असे एकूण २९ मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे रुग्णांच्या एकूण मृत्यूची संख्या १४२८ झाली असून मृत्यूचा दर ३.४२ टक्के झाला आहे. तर पॉझिटिव्ह रुग्णांचा दर १७.६८ पर्यंत पोहचला आहे.
हेही वाचा- कोरोनामुळे पालक गमावलेल्या एक हजार मुलांना दत्तक घेण्याचा पुरुषोत्तम धोंडगेंचा निर्णय