मंगळवारी 655 नवे रुग्ण, तर 11 कोरोना बाधितांचा मृत्यू - ratnagiri coeona death
रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत 45 हजार 313 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.
रत्नागिरी-जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 578 तर त्यापूर्वीचे 77 असे एकूण 655 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर जिल्ह्यात आज 11 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
आतापर्यंत 45 हजार 313 पॉझिटिव्ह रुग्ण
मंगळवारी आलेल्या आलेल्या अहवालानुसार 578 नागरिक पॉझिटिव्ह सापडले आहेत. तर यापूर्वीचे 77 असे 655 रुग्ण सापडले आहेत. 578 पैकी आरटीपीसीआर चाचणी केलेल्या 2 हजार,तर 532 पैकी 352 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर अँटीजेन टेस्ट केलेल्या 2 हजार 988 पैकी 226 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे . जिल्ह्यात आतापर्यंत 45 हजार 313 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.
चोवीस तासात 11 मृत्यू
जिल्ह्यात मागील चोवीस तासात 11 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, आतापर्यंत एकूण 1 हजार 545 रुग्णांचे कोरोनाबळी गेले आहेत. जिल्ह्याचा मृत्युदर 3.40 टक्क्यांवर आहे.रत्नागिरी तालुक्यात आज 8 तर आतापर्यंत सर्वाधिक 458 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे .
हेही वाचा-राज्यात मागील 24 तासांत 9 हजार 350 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ, 388 मृत्यू