रत्नागिरी - गोवा महामार्गावरील चौपदरीकरणासाठी संपादित करण्यात आलेल्या लोटे परिसरातील अतक्रिमणावर बुलडोझर फिरवण्यात आला आहे. या धडक कारवाईमुळे अनभिज्ञ राहिलेल्या व्यावसायिकांची एकच पळापळ उडाली. परिसरातील अतिक्रमणे हटवल्यानंतर लवकरच सपाटीकरणाचे काम हाती घेऊन चौपदरीकरणाच्या कामास प्रारंभ होणार आहे. असे महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मार्फत सांगण्यात आले.
गोवा महामार्ग चौपदरीकरणासाठी लोटे परिसरातील अतक्रिमणे अखेर जमीनदोस्त - खवटी ते परशुराम घाटापर्यंतच्या चौपदरीकरण बातमी
महामार्गावरील खवटी पासून परशुराम घाटापर्यंतच्या चौपदरीकरण कामापैकी लोटे परिसरातील चौपदरीकरणावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. मात्र, या परिसरातील संपादित जागांवरच काही दुकान व हॉटेल व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्याने चौपदरीकरणाच्या कामात अडथळा निर्माण झाला होता.
हेही वाचा-माजी मंत्री बाबासाहेब धाबेकर काळाच्या पडद्याआड
महामार्गावरील खवटी पासून परशुराम घाटापर्यंतच्या चौपदरीकरण कामापैकी लोटे परिसरातील चौपदरीकरणावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. मात्र, या परिसरातील संपादित जागांवरच काही दुकान व हॉटेल व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्याने चौपदरीकरणाच्या कामात अडथळा निर्माण झाला होता. यामुळे राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांनी अतिक्रमण केलेल्या व्यावसायिकांना तोंडी व लेखी सुचना दिल्या होत्या. मात्र, या सूचनांकडे कानाडोळा करत संपादित जागेवरच काही व्यावसायकांनी दुकाने थाटली होती. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या अधिकाऱ्यांनी संबंधितांना पुन्हा अतिक्रमणे हटवण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. अतिक्रमणावर बुलडोझर फिरवण्याची तंबी देण्यात आली होती. यामुळे व्यावसायिकांचे धाबेही दणाणले होते. मात्र, पुन्हा मुभा मिळेल या शक्यतेने काही व्यावसायिक बिनधास्त होते. मात्र, प्रशासनाने दिलेल्या डेडलाईनच्या दोन दिवस अगोदरच अतिक्रमणावर बुलडोझर फिरवण्याची प्रक्रीया सुरू केल्याने व्यावसायिकांची एकच धावाधाव झाली आहे.