रत्नागिरी :यावेळी उदय सामंत बोलत होते. यावेळी विजय पालकर, भारती पालकर, राहूल पालकर, राहूल पंडीत, प्रमोद पवार, श्रद्धा गुरव, बाबू साळवी , पदाधिकारी व ग्रामस्थ इ. उपस्थित होते. वयाच्या सत्तरीत पालकर दांपत्याने सामजिक बांधिलकेच्या जाणीवेतून अठरा खोल्यांचा सुसज्ज वृध्दाश्रम उभारला आहे. वयोवृद्धांची राहण्याची उत्तम सोय, शुद्ध, सात्विक, शाकाहारी आहार, प्रशिक्षित काळजीवाहू कर्मचारी वर्ग, आरोग्य कर्मचारी व रुग्णवाहिका सेवेसह, निसर्गाच्या सानिध्यात 18 खोल्यांचे प्रशस्त संकुल अशा सेवा या सिनिअर सिटीझन होमद्वारे दिल्या जाणार आहेत. वृध्द आजी-आजोबांसाठी वाचनालय, मनोरंजन, योगाभ्यास, लिप्ट अशा सोयी सुविधांयुक्त हे सिनिअर सिटीझन होम आहे. हा चांगला उपक्रम पालकर फाऊंडेशने राबवला आहे असे आमदार शेखर निकम यावेळी म्हणाले. तसेच पालकर दांपत्याने सामाजिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून या माळरानावर अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे असं आमदार शेखर निकम यावेळी म्हणाले.
समाज भावनेतून हाती घेतला उपक्रम :मुळात शिक्षण, व्यवसाय हे मुंबईसारख्या माया नगरीत होवून सुध्दा वयाच्या 70 व्या वर्षी सुध्दा पालकर यांचे कार्य आणि उमेद तरुणांना लाजवणारी आहे. कोकणची लाल मातीने त्यांच्यातील कृतीशिलतेला साद घातल्यामुळे आणि पत्नीची आणि सुध्दा समर्थ साथ लाभल्यामूळे माळरानावर आनंदाचा आणि रोजगार निर्मितीचा मळा व वयोवृद्धांसाठी वृद्धाश्रम आपण फुलवू शकलो, असे विजय पालकर यांनी सांगितलं. समाज भावनेतून आम्ही हा उपक्रम हाती घेतला असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं.