महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रत्नागिरीत संततधार; मच्छिमारांना सावधानतेचा इशारा - रत्नागिरीत पावसाची संततधार

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. या कमी दाबाच्या क्षेत्राचे चक्रीवादळात रुपांतर होत आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टी व रत्नागिरीच्या किनाऱ्यावर समुद्र खवळलेला राहणार आहे.

रत्नागिरीत पावसाची संततधार

By

Published : Oct 25, 2019, 1:09 PM IST


रत्नागिरी - जिल्ह्यात शुक्रवारी सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने उघडीप दिलेली नाही. पावसाच्या या खेळामुळे शेतकरी मात्र, संकटात सापडला आहे.

रत्नागिरीत पावसाची संततधार


यावर्षी नोव्हेंबर महिना आला तरी पाऊस सुरूच आहे. शेतातील भातपीक पूर्ण तयार झाल्याने शेतकरी पीक कापणीच्या तयारीत आहे. अनेक ठिकाणी शेतात कापून ठेवलेले भातपीक शेतातच भिजले आहे. हे पीक पुन्हा शेतातच रुजण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत आहे. हातातोंडाशी आलेला घास हीरावल्या जाण्याच्या भितीने शेतकरी चिंतेत आहे.

हेही वाचा - श्रीवर्धन मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे यांचा मोठ्या मताधिक्याने विजयी

मच्छिमारांना सावधानतेचा इशारा

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. या कमी दाबाच्या क्षेत्राचे चक्रीवादळात रुपांतर होत आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टी व रत्नागिरीच्या किनाऱ्यावर समुद्र खवळलेला राहणार आहे. या कालावधीत मासेमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये. जिल्ह्यातील सर्व समुद्र किनारे पर्यटक आणि नागरिकांसाठी बंद ठेवण्यात यावेत, असे आवाहन जिल्हाधिकाऱयांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details