महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 2200 पार, मृतांची संख्या 75 वर - रत्नागिरी कोरोना ताजी बातमी

शनिवारी रात्री उशिरा प्राप्त झालेल्या 284 अहवालांपैकी 62 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 2 हजार 210 झाली आहे. दरम्यान नव्याने सापडलेल्या रुग्णांमध्ये रत्नागिरी 4, कामथे 44, लांजा 1, गुहागर 4, दापोली 5, अँटिजेन 4 जणांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 2200 पार
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 2200 पार

By

Published : Aug 9, 2020, 4:52 PM IST

रत्नागिरी : जिल्ह्यात गेले काही दिवस सातत्याने कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे, तर दुसरीकडे मृतांचा आकडाही वाढत आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 2 हजार 200 पार गेली असून एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 2 हजार 210 एवढी झाली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. गेल्या काही दिवसांत तर ही संख्या झपाट्याने वाढली आहे. दरम्यान, शनिवारी रात्री उशिरा प्राप्त झालेल्या 284 अहवालांपैकी 62 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 2 हजार 210 झाली आहे. दरम्यान नव्याने सापडलेल्या रुग्णांमध्ये रत्नागिरी 4, कामथे 44, लांजा 1, गुहागर 4, दापोली 5, अँटिजेन 4 जणांचा समावेश आहे.

मृतांची संख्या 75 वर

जिल्ह्यात आणखी दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. एका 43 वर्षे वयाच्या व्यक्तीचा अहवाल शुक्रवारी सायंकाळी केलेल्या अँटीजेन टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आल्याने त्याला कळंबणी येथे दाखल करण्यात आले होते. या रुग्णाचा शनिवारी मृत्यू झाला. तर, एका 70 वर्षीय महिलेचा देखील मृत्यू झाला. हे दोन्ही रुग्ण दापोली तालुक्‍यातील आहेत. यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या 75 झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details