रत्नागिरी - जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. यामध्ये आणखी 7 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 132वर पोहचली आहे.
कोरोना अपडेट : रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 132 वर
रत्नागिरी जिल्ह्यात आणखी 7 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांचा संख्या आता 132 वर पोहचली आहे.
गेले काही दिवस जिल्ह्यात सातत्याने कोरोनाा रुग्णांची संख्या वाढत आहे. कधी 4, तर कधी 7, तर कधी 11 अशी कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. शुक्रवारी रात्री मिरज येथून 455 अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले. यापैकी 448 अहवाल निगेटिव्ह आले तर 7 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये गुहागर, दापोली, रत्नागिरीमध्ये प्रत्येकी 2 जणांना तर संगमेश्वरमध्ये एकाला कोरोनाची लागण झाली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा हा 132 वर पोहोचला आहे. त्यामुळे गेल्या दिवसांत सातत्याने वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या जिल्ह्याच्या चिंतेत भर टाकणारी आहे.