महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चिपळूण तालुक्यात 'भारत बंद'ला अल्प प्रतिसाद

केंद्राने लागू केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधा देशात सर्वत्र आंदोलन सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनांनी मंगळवारी (दि. 8 डिसें.) भारत बंदची हाक दिली होती. यास राज्यभरातून संमिश्र प्रतिसाद मिळत असताना चिपळूण शहर व तालुक्यामध्ये अत्यल्प प्रतिसाद पहायला मिळाला.

बाजारपेठ
बाजारपेठ

By

Published : Dec 8, 2020, 5:23 PM IST

Updated : Dec 8, 2020, 6:14 PM IST

चिपळूण (रत्नागिरी) -केंद्राने लागू केलेल्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला विविध राजकीय पक्षांनी आपला पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र, चिपळूण शहर व तालुक्यातील गावांमध्ये सकाळपासून सर्व सुरळीत सुरू आहे. यामुळे चिपळूण तालुक्यात भारत बंदला अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याचे दिसत आहे.

आढावा घेताना प्रतिनिधी

सर्व वाहतूक सुरळीत

शहरातील रिक्षा व एसटी बस वाहतूक, भाजी मंडई त्याचबरोबर सर्व दुकाने चालू असलेले पाहायला मिळाले. मुंबई-गोवा महामार्गावरील दोन्ही बाजूकडील वाहतूक सुरळीत सुरू असल्याने भारत बंद तालुक्यात अयशस्वी ठरला आहे.

हेही वाचा -शेतकरी आंदोलनावरुन तावडेंनी नाव न घेता शिवसेनेला फटकारले

हेही वाचा -'शिवसेना-राष्ट्रवादी सारख्या विरोधकांना "हा" विषय चिघळवायचा आहे'

Last Updated : Dec 8, 2020, 6:14 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details