शिवसेनेच्या 10 रुपयातल्या थाळीची निलेश राणेंकडून खिल्ली - News about Shiv Sena's 10 rupee dish
दहा रुपयात मिळणाऱ्या शिवसेनेच्या थाळीची माजी खासदार निलेश राणेंनी खिल्ली उडवली. या बाबत त्यांनी समाज माध्यमाद्वारे ट्टिवट केले आहे
रत्नागिरी - दहा रुपयात मिळणाऱ्या शिवसेनेच्या थाळीची माजी खासदार निलेश राणेंनी खिल्ली उडवली आहे. सोशल मीडियावरून यासंदर्भात ट्टिवट केलं आहे. ही थाळी ३४ ते ३५ रुपयांना बनणार त्याचे अनुदान ठेकेदाराला मिळणार. अनुदान त्या ठेकेदाराला वेळेत मिळणार का, हा देखिल प्रश्न आहे. त्यामुळे या थाळीची अवस्था सेनेच्या झुणकाभाकर केंद्राप्रमाणेच होणार आहे. पण या थाळीतून जेलपेक्षा चांगल जेवण मिळेल की जेलमध्ये मिळतं त्याच्यापेक्षा वाईट जेवण मिळेल, याबद्दल मला शंका असल्याचं मत निलेश राणेंनी व्यक्त केलंय. आजही सेनेची झुणकाभाकर केंद्र नेपाळी आणि परप्रांतीय चालवतात. आजही झुणका भाकर केंद्रातील दर हे ग्रेड टू हॉटेलच्या प्रमाणे दर आहेत. त्यामुळे दहा रुपयांची सेनेची हि थाळी किती दिवस चालेल यावर निलेश राणेंनी शंका उपस्थित करत थाळीची खिल्ली आहे.