महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गीतेश राऊतवर तत्काळ 353चा गुन्हा दाखल करा, निलेश राणेेंचे पोलीस अधीक्षकांना पत्र - निलेश राणेंचे पोलीस अधीक्षकांना पत्र

ड्युटीवरील वाहतूक पोलिसाला शिवीगाळ करणाऱ्या खासदार विनायक राऊत यांचा मुलगा गितेश राऊत याच्यावर 4 दिवसानंतरही गुन्हा का दाखल नाही? असा सवाल माजी खासदार निलेश राणे यांनी केला आहे. याबाबत सिंधुदुर्गच्या पोलीस अधीक्षकांनी गीतेश राऊत याच्यावर तत्काळ 353चा गुन्हा दाखल करण्याची मागणी निलेश राणे यांनी पत्राद्वारे केली आहे.

Nilesh Rane wrote  letter to SP  demand for Immediately file a case of 353 against Gitesh Raut
निलेश राणेेंचे पोलीस अधीक्षकांना पत्र

By

Published : Jul 22, 2020, 5:10 PM IST

रत्नागिरी -ड्युटीवरील वाहतूक पोलिसाला शिवीगाळ करणाऱ्या खासदार विनायक राऊत यांचा मुलगा गीतेश राऊत याच्यावर 4 दिवसानंतरही गुन्हा का दाखल नाही? असा सवाल माजी खासदार निलेश राणे यांनी केला आहे. याबाबत सिंधुदुर्गच्या पोलीस अधीक्षकांनी गीतेश राऊत याच्यावर तत्काळ 353चा गुन्हा दाखल करण्याची मागणी निलेश राणे यांनी पत्राद्वारे केली आहे.

निलेश राणेेंचे पोलीस अधीक्षकांना पत्र


खासदार विनायक राऊत यांचा मुलगा गीतेश याचा कणकवलीत वाहतूक पोलीसासोबत वाद झाला होता. याबाबतचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ही घटना 17 जुलै रोजी घडली होती. मात्र, अद्यापही याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला नाही. याबाबत माजी खासदार निलेश राणे यांनी ट्विटरवर नाराजी व्यक्त केली आहे. अद्याप खासदार राऊत यांच्या मुलावर कोणतीही कारवाई झालेली नाही. मी पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांना पत्र लिहून कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांना व्हिडिओही तपासून घ्यायला सांगितले आहे, कारण हा एडिट केलेला व्हिडिओ नाही. कायदा सगळ्यांना समान असतो, हे पोलिसांनी दाखवून द्यावे, असे ट्विट राणेंनी केले आहे. पोलीस अधीक्षक यांना सादर केलेल्या पत्रात गीतेश राऊत याच्यावर तत्काळ 353चा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे.

निलेश राणेेंचे पोलीस अधीक्षकांना पत्र

ABOUT THE AUTHOR

...view details