रत्नागिरी- जिल्ह्यात आरोग्याचे तीन-तेरा वाजले आहेत. जिल्हा रुग्णालयात १३१ वैद्यकीय अधिकारी आस्थापनेवर दाखवत आहेत, मात्र सध्या १७ ते १८ च डॉक्टर काम करत आहेत. जिल्हा रुग्णालयात २७ दिवसांपासून एम.डी फिजीशियन नाही, असे सांगत जिल्हा रुग्णालयातील कारभाराबाबत भाजप नेते व माजी खासदार निलेश राणे यांनी काल (8 ऑगस्ट) उघडपणे नाराजी व्यक्त केली. तसेच त्यानी कोरोनावरून प्रशासनासह लोकप्रतिनिधींचा खरपूस समाचार घेतला.
काल रत्नागिरीत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी निलेश राणे यांनी जिल्हा रुग्णालयातील अव्यवस्थेबाबत नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, रत्नागिरीची अवस्था ही बिकट होत चालली आहे. अवघ्या १० व्हेंटिलेटरवर जिल्ह्याचे आरोग्य अवलंबून आहे. जिल्हा रुग्णालयाची ही अवस्था आहे, तर इतर छोट्या रुग्णालयांची अवस्था काय असेल, असा सवाल राणे यांनी केला आहे.
कामथे रुग्णालयातील 5 डॉक्टरांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे रुग्णालयातील 70 रुग्णांना एक डॉक्टर पाहतो आहे. हे चित्र भयानक आहे. याबाबत कोणी विचारपूस करत नाही. रुग्णालयात काय चालले आहे, त्याकडे कोणी पाहात नाही. ही गंभीर अवस्था असल्याचे राणे म्हणाले. दरम्यान, ही सर्व परिस्थिती आपण आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या निदर्शनास आणून देणार आहोत. आणि तरीही विषय सुटला नाही तर आंदोलन करणार असल्याचा इशारा राणे यांनी दिला.
रत्नागिरीचे पालकमंत्री हे मिस्टर इंडिया