रत्नागिरी -राज्याने दिलेल्या एसओपीनुसार महाराष्ट्रात सर्व गोष्टी सुरू असताना रत्नागिरीत कडक कर्फ्यु कशासाठी, असा प्रश्न माजी खासदार निलेश राणे यांनी राज्यसरकारला विचारला आहे. जिल्हा प्रशासनाच्या आरोग्य सेवेच्या अपयशाचे खापर रत्नागिरीच्या जनतेवर फोडू नका. राज्याने दिलेल्या नियमावलीप्रमाणे ज्या गोष्टी सुरू आहेत. त्या रत्नागिरीमध्येही सुरू राहिल्या पाहिजेत, असेही नीलेश राणे म्हणाले.
रत्नागिरीला भिकेला लावायचे ठरवलयं का? नीलेश राणेंचा राज्यसरकारला सवाल - BJP leader nilesh rane latest news
दोन दिवसांपूर्वी राज्य शासनाने कोविड प्रतिबंधसाठी नवीन अद्यादेश जाहीर करत राज्यात संचारबंदी लागू केली. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यात कडक कर्फ्यु लावला गेला आहे, महाराष्ट्र राज्यात वेगळा नियम आणि फक्त रत्नागिरीसाठी वेगळा नियम असता कामा नये, असे नीलेश राणे यांनी म्हटलं आहे.
दोन दिवसांपूर्वी राज्य शासनाने कोविड प्रतिबंधसाठी नवीन अद्यादेश जाहीर करत राज्यात संचारबंदी लागू केली. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यात कडक कर्फ्यु लावला गेला आहे, महाराष्ट्र राज्यात वेगळा नियम आणि फक्त रत्नागिरीसाठी वेगळा नियम असता कामा नये, असे निलेश राणे यांनी म्हटलं आहे. मुंबईसह अन्य जिल्ह्यात रिक्षा, रेल्वे, हॉटेल्स सुरू आहेत. मग रत्नागिरीमध्ये असे काय झाले की त्याठिकाणी कर्फ्यु लावला जात आहे? असा सवाल नीलेश राणे यांनी केला आहे.
'लोकांचा अंत पाहू नका'
इतर जिल्ह्यांपेक्षा रत्नागिरीला वेगळी नियम लावले जात आहेत. ज्या गोष्टी राज्यात सुरू आहेत त्या रत्नागिरीत बंद आहेत. रत्नागिरीला भिकेला लावायचे ठरवले आहेत काय? असा सवाल नीलेश राणे यांनी केला आहे. ज्या गोष्टी महाराष्ट्रभर सुरू आहेत, त्या रत्नागिरीत सुरू झाल्या पाहिजेत, अशी मागणीही राणे यांनी केली आहे. तसेच लोकांचा अंत पाहू नका, असा इशाराही त्यांनी दिला आहे.