रत्नागिरी -चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटल्याच्या घटनेला एक वर्ष पूर्ण झाले. या एक वर्षात तिवरेतील ग्रामस्थांचे अद्यापही कायमस्वरूपी पुनर्वसन झालेले नाही. यावर भाजप नेते निलेश राणे यांनी संताप व्यक्त केला असून, शिवसेनेच्या मंत्री, स्थानिक आमदार आणि खासदारांनी चुना जनतेला लावण्याचेच काम केल्याची टीका त्यांनी केली आहे. 2 जुलै 2019 ला तिवरे धरण फुटले आणि या दुर्घटनेत मोठी जीवितहानी आणि वित्तहानी झाली होती.
"शिवसेनेच्या आमदार, खासदारांनी तिवरेवासीयांना चुना लावला" - निलेश राणे शिवसेना टीका
एक वर्षात तिवरेतील ग्रामस्थांचे अद्यापही कायमस्वरूपी पुनर्वसन झालेले नाही. यावर भाजप नेते निलेश राणे यांनी संताप व्यक्त केला असून, शिवसेनेच्या मंत्री, स्थानिक आमदार आणि खासदारांनी चुना जनतेला लावण्याचेच काम केल्याची टीका त्यांनी केली आहे.
धरण फुटल्यामुळे 22 घरे, जनावरांचे गोठे वाहून गेले होते. 21 जणांना जीव गमवावा लागला होता तर दीड वर्षांची दुर्वा आजही बेपत्ता आहे. दरम्यान या ग्रामस्थांचे अनेक प्रश्न आजही मार्गी लागलेले नाहीत, त्यामुळे या सर्व घडामोडींबाबत भाजपा नेते निलेश राणे यांनी शिवसेनेच्या आमदार आणि खासदारांवर रोष व्यक्त केला आहे.
निलेश राणे यांनी ट्विटरवर देखील संताप व्यक्त केला असून ते म्हणतात की, शिवसेनेचे आमदार, खासदार आणि 2 पालकमंत्री असूनसुद्धा तिवरे येथील कुटुंब गेली एक वर्ष कन्टेनरमध्ये राहत आहेत. सिद्धिविनायक ट्रस्टने दिलेले 5 कोटी कुठे गेले माहिती नाही. घर गेलं, शेत गेलं आणि कुटुंबातील लोकांचे जीवही गेले. शिवसेनेच्या आमदार खासदारांना कुटुंब उद्ध्वस्त झाली तरी चालतील पण गोड बोलायचं आणि चुना लावायचंच काम ते करणार, अशी खरमरीत टीका त्यांनी केली आहे.