रत्नागिरी -शिवसेना-राष्ट्रवादी सारखे जे विरोधक आहेत त्यांना हा विषय चिघळवायचा आहे. त्यांना कुठेतरी वाटतंय की मोदी सरकार संकटात येईल, अडचणीत येईल, त्यामुळे ते हा विषय त्यांच्या माध्यमातून पेटवायचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप भाजप नेते माजी खासदार निलेश राणे यांनी महाविकास आघाडीवर केला आहे. ते रत्नागिरीत बोलत होते.
शरद पवारांनी भूमिका का बदलली
यावेळी बोलताना निलेश राणे म्हणाले की, ज्या कायद्याचा विरोध आज राष्ट्रवादी आणि संपूर्ण महाविकास आघाडी करत आहे. त्याच कायद्याची मागणी शरद पवारांनी 2010 मध्ये पत्राद्वारे केली होती. आता नेमके काय झाले, शरद पवारांनी स्वतःच्याच पत्राची भूमिका का बदलली. 10 वर्षांपूर्वी एक भूमिका आणि 10 वर्षानंतर आता एक भूमीका घेत शरद पवार विरोध का करत आहेत, असे राणे म्हणाले.
शिवसेना कायदे कधी वाचत नाही
शिवसेनेबाबत बोलताना निलेश राणे म्हणाले की, शिवसेनेचे सोडून द्या, शिवसेनेला तेवढी अक्कल नाही त्यांनी ते कायदेही वाचले नसतील, शरद पवार विरोध करताहेत म्हणून शिवसेना विरोध करत आहे.