महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अजित पवार यांनी पुण्याची वाट लावली - निलेश राणे - ajit pawar breaking news

महाराष्ट्रात लॉकडाऊनमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वात जास्त वाट पुण्याची लावली असं म्हणत भाजपा प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

अजित पवार यांनी पुण्याची वाट लावली - निलेश राणे
अजित पवार यांनी पुण्याची वाट लावली - निलेश राणे

By

Published : Apr 11, 2021, 4:03 PM IST

रत्नागिरी - महाराष्ट्रात लॉकडाऊनमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वात जास्त वाट पुण्याची लावली असं म्हणत भाजपा प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. याबाबत बोलताना राणे म्हणाले की, एरव्ही तोंडावरचा मास्क न काढणारे अजित पवार पंढरपुरात जावून भरगच्च सभा घेतात आणि काल सांगतात लाॅकडाऊन लावावा लागेल, अशा शब्दात निलेश राणेंनी अजित पवार यांना फटकारलं आहे.

अजित पवार यांनी पुण्याची वाट लावली - निलेश राणे

तर सर्वपक्षिय बैठकित पुण्याला वेगळा न्याय अजित पवार कसा मागू शकतात, पुणे वेगळे राज्य आहे का की पवारांचे आहे, या मंत्र्यांची जर अशी नाटकं चालू राहिली, तर लोकं या नेत्यांना रस्त्यावर उतरून मारतील, अशा शब्दात निलेश राणेंनी अजित पवारांवर प्रहार केला आहे.

अनिल परब यांना कोणीही वाचवू शकणार नाही-

अनिल देशमुख यांच्याप्रमाणेच अनिल परब यांचंही होणार. अनिल परब यांना कोणीही वाचवू शकणार नाही. मुली किंवा बाळासाहेबांप्रमाणेच उद्धव ठाकरेंचीही शपथ घ्या... शपथांवर कायदा चालत नाही, त्यांना कारवाईला सामोरं जावं लागेल. अनिल परब यांचा नागपूरमधीलही 60 कोटींच्या वसुलीचा विषय बाहेर पडला आहे. हे फक्त लूटमार करायला, दरोडे टाकायलाच एकत्र आले असल्याची टीका राणे यांनी यावेळी केली.

एनआयए किंवा सीबीआय जे करणार आहे. ते भाजपचे लोक अगोदरच बोलून मोकळे होतात, अशी टीका खासदार विनायक राऊत यांनी केली होती. या टीकेला निलेश राणे प्रत्युत्तर दिलं आहे. विनायक राऊत यांना एनआयए किंवा सीबीआयचा फुलफॉर्म तरी माहिती आहे का? असं प्रत्युत्तर देत राणे यांनी राऊत यांच्यावर प्रहार केला आहे. मंत्र्यांना वाचविण्यासाठी ही सर्व वक्तव्य केली जात आहेत. जे खरं आहे ते तपासात समोर येईल, यांचे अजून 3 ते 4 मंत्री जाणार, त्यामुळे या ठाकरे सरकारच्या मंत्र्यांना कोणीही वाचवू शकणार नाही. विनायक राऊत यांना महाराष्ट्रात कोणी विचारत नाही, अशी टीका निलेश राणे यांनी खासदार विनायक राऊत यांच्यावर यावेळी केली.

हेही वाचा-कोरोनाची लस, व्हेंटिलेटर देण्यात महाराष्ट्राबरोबर केंद्राचा दुजाभाव, काँग्रेस-राष्ट्रवादीचा आरोप

ABOUT THE AUTHOR

...view details