दीपक केसरकर 2024 नंतर जिल्ह्याच्या राजकारणामधूनही गायब होतील - निलेश राणे - निलेश राणे
माजी खासदार निलेश राणे यांनी दीपक केसरकर यांच्यावर टीका केली आहे. नारायण राणेंवरील भाष्यामुळे निलेश राणेंनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.
दिपक केसरकर 2024 नंतर जिल्ह्याच्या राजकारणामधूनही गायब होतील - नीलेश राणे
रत्नागिरी -दीपक केसरकर आता कोरोनाच्या काळात जसे स्वतःच्या मतदारसंघातून गायब होते, तसे जिल्ह्याच्या राजकारणामधूनही 2024 नंतर गायब होतील, अशी टीका माजी खासदार निलेश राणे यांनी केली आहे. ते रत्नागिरीत बोलत होते.
नारायण राणेंचे नाव घेऊन हे मोठे झाले-
दीपक केसरकर हे नारायण राणेंचे नाव घेऊन मोठे झाले. पुढे मंत्रीही झाले. आज महाराष्ट्रात वेगळी ओळख त्यांना नारायण राणेंमुळे मिळाली; म्हणून त्या माणसाला आम्ही गांभीर्याने कधी घेतलेले नाही, अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे. दीपक केसरकर आता कोरोनाच्या काळात जसे स्वतःच्या मतदारसंघातून गायब होते, तसे जिल्ह्याच्या राजकारणामधूनही 2024 नंतर गायब होतील, असा दावाही नीलेश राणे यांनी केला आहे.