रत्नागिरी - खंबाटा एव्हीशन कंपनीने कामगारांना शेवटचा टप्पा देऊ नका, असे सांगणाऱ्या करारावर भारतीय कामगार सेनेच्या प्रतिनिधींच्या सह्या होत्या, त्यामुळेच शेवटचा टप्पा कामगारांना मिळाला नाही. या प्रकरणात राऊत आणि मातोश्रीला याचा फायदा झाला, असा आरोप निलेश राणेंनी विनायक राऊतांवर केला.
खंबाटा प्रकरणात विनायक राऊत आणि मातोश्रीलाच फायदा - निलेश राणे - खंबाटा एव्हीशन कंपनी
खंबाटा एव्हीशन कंपनीने कामगारांना शेवटचा टप्पा देऊ नका, असे सांगणाऱ्या करारावर भारतीय कामगार सेनेच्या प्रतिनिधीच्या सह्या होत्या, असा आरोप निलेश राणेंनी विनायक राऊतांवर केला आहे.
खंबाटा एव्हीएशन प्रकरणावरून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार निलेश राणे यांनी विनायक राऊत यांच्यावर पलटवार केला. ते म्हणाले, खंबाटा एव्हीशनच्या शेवटच्या करारावर फक्त मान्यताप्राप्त संघटना असलेल्या भारतीय कामगार सेनेच्या प्रतिनिधीच्या सह्या होत्या. राणेंची कुठेही सही नव्हती. फक्त २०१२ मध्ये पगार वाढीच्या करारावर राणेंची सही होती. शेवटचा टप्पा कामगारांना देऊ नका, असे सांगणाऱ्या करारावर भारतीय कामगार सेनेच्या प्रतिनिधीच्या सह्या होत्या, यामुळे हा शेवटचा टप्पा कामगारांना मिळाला नाहीच. उलट कंपनी बंद झाली आणि २७०० कामगार उद्धवस्त झाले, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.