रत्नागिरी - विनायक राऊत यांनी मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला असून त्यांनी काढलेला जाहीरनामा बोगस आहे, अशी टीका निलेश राणेंनी राऊतांवर केली आहे.
जाहीरनाम्यातून राऊतांनी जनतेची दिशाभूल केली, निलेश राणेंचा आरोप - Nilesh Rane
विनायक राऊत यांनी काढलेला जाहीरनामा बोगस आहे, अशी टीका निलेश राणेंनी राऊतांवर केली आहे.
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या वतीने रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्यात कोकण व्हिजनवर भर देण्यात आला आहे. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना राणेंनी राऊतांवर पुन्हा एकदा टीका केली. राऊत यांनी आपल्या जाहीरनाम्यात खोटी आणि चुकीची माहिती देऊन जनतेची दिशाभूल केली असल्याचा आरोप त्यांनी केला.
राऊतांचा जाहीरनामा बोगस असून या विरोधात दाद मागणार असल्याची माहिती ही त्यांनी यावेळी दिली. २७ कोटी ३२ लाखांचा आकडा आला कुठून, असे म्हणत ३ हजार १७१ कोटी रुपयांचा निधी खासदारांनी कुठून आणला आणि कुठे खर्च केला ते त्यांनी जाहीर करावे, असे आव्हान राणेंनी राऊतांना दिले.