रत्नागिरी - जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णात वाढ होत असताना त्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर्स, नर्सेस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षितता आणि आरोग्याची काळजी लाईफ टाईम हॉस्पिटलचे संचालक, भाजप नेते, माजी खासदार नीलेश राणे यांनी घेतली आहे. त्यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात पीपीई किट उपलब्ध करून दिले आहेत.
नीलेश राणेंनी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात उपलब्ध केले 'पीपीई किट' - निलेश राणेंनी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात उपलब्ध केले पीपीई किट
हे किट उत्कृष्ट दर्जाचे असून याचा उपयोग कर्मचाऱ्यांना निश्चित होईल, असे डॉ. बोलडे यांनी निलेश राणे यांच्याशी दूरध्वनीवर बोलताना सांगितले आणि आभार मानले.
सध्या सगळे जग कोरोनाशी लढत आहे. राज्यासह रत्नागिरीमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. या रुग्णांची आणि सर्वसामान्य लोकांच्या आरोग्याची खबरदारी घेतली जात आहे. मात्र, त्याचवेळी त्यांच्यावर उपचार करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे आरोग्यही तितकेच महत्त्वाचे आहे. हीच गोष्ट हेरून त्यांनी रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टर्स, कर्मचारी यांच्यासाठी पीपीई किट उपलब्ध करून दिले आहेत. समाजासाठी लढणाऱ्या घटकांना आपण देणे लागतो, ही गोष्ट लक्षात ठेवून हे किट उपलब्ध करून दिले. या पीपीई किटमध्ये गॉगल, वेस्ट कलेक्शन बॅग, सर्जिकल गाऊन विथ हूड कव्हर, ग्लोव्हज, शू-कव्हर आशा गोष्टींचा समावेश आहे.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बोलडे, डॉ. सुभाष चव्हाण आणि रत्नागिरी जिल्हा डॉक्टर्स असोसिएशनचे सदस्य डॉ. अभय धुळप, यांच्या उपस्थितीत ते जिल्हा रुग्णालयात सुपूर्त करण्यात आले. हे किट उत्कृष्ट दर्जाचे असून याचा उपयोग कर्मचाऱ्यांना निश्चित होईल, असे डॉ. बोलडे यांनी निलेश राणे यांच्याशी दूरध्वनीवर बोलताना सांगितले आणि आभार मानले.