रत्नागिरी - नवाब मलिक हेच दाऊदचे फ्रंट मॅन असू ( Nawab Malik front man of Dawood ) शकतात, असा खळबळजनक आरोप भाजपचे प्रदेश सचिव आणि माजी खासदार निलेश राणे यांनी केला आहे. याच मुद्यावर माजी खासदार निलेश राणे यांनी रत्नागिरीत पत्रकार परिषद ( Nilesh Rane press in Ratnagiri ) घेतली. यावेळी त्यांनी नवाब मलिक यांचा समाचार घेत, महाविकास आघाडी सरकारवरदेखील जोरदार टीका केली.
भाजपचे प्रदेश सचिव निलेश राणे म्हणाले ( Nawab Maliks relation with Dawood Ibrahim ) की, दाऊदच्या माणसाकडून कवडीमोल दराने जमिन खरेदी करण्यात आली. त्यात ब्लॅक मनीचा वापर झाला आहे. त्याचमुळे ईडी तपास करत आहे. दाऊद हा देशाचा एक नंबरचा शत्रू आहे. बाॅम्बस्फोट घडविणाऱ्यांकडून तुम्ही जमिन खरेदी करता. दाऊदचा खरा फ्रंट मॅन नवाब मलिक असू शकतो, असा खळबळजनक आरोप माजी खासदार राणे ( Nilesh Rane allegations over Nawab Maliks ) यांनी केला आहे.
हेही वाचा-Chandrakant Patil : 'नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला नाही तर अधिवेशन चालू देणार नाही'
दाऊदचा माणुस पवार यांना चालतो
निलेश राणे यांनी थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. शरद पवार हे गंभीर विषयावर बोलत नाहीत. नबाव मलिक यांच्यासाठी राष्ट्रवादी रस्त्यावर उतरते. नबाव मलिकांचे हे प्रकरण गंभीर आहे. देशाच्या संरक्षणासाठी हे प्रकरण धोकादायक आहे. मलिक यांचा राजीनामा राष्ट्रवादीने घ्यायला पाहिजे. पण पवार साहेबांनी अशा लोकांना पक्षात ठेवता कामा नये, असे सांगत निलेश राणे यांनी पवारांवर हल्लाबोल केला. दाऊदचा माणुस पवार यांना चालतो. युक्रेनसाठी भाजपच्या नेत्यांना फोन लावता. पण यावर काही बोलत नाही, असा खोचक टोला निलेश राणेंनी पवार यांना लगावला.