रत्नागिरी - आत्मनिर्भर रॅलीवर टीका करणाऱ्या पालकमंत्री अनिल परब यांनी रत्नागिरी जिल्ह्यासाठी काय योगदान दिले, हे जाहीर करावे. त्यानंतरच टीका करावी, अशा शब्दांत निलेश राणे यांनी मंत्री अनिल परब यांचा समाचार घेतला आहे. निसर्ग वादळात जनतेला केलेली मदत शिवेनेचेच कोतवाल आणि सरपंच वाटून खात असल्याचा आरोप त्यांनी केला. सरकारला जाब विचारणे ही टीका कशी काय होऊ शकते, असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. 'शिवसेनेचा 'ड्रामा' आता जनतेला पचणार नाही, लवकरच भ्रष्टाचार बाहेर काढणार', असा इशारा निलेश राणे यांनी दिला आहे.
पालकमंत्री जिल्ह्यात अडीच दिवस फिरकले
पालकमंत्री अनिल परब यांनी भारतीय जनता पक्षाच्याच्या आत्मनिर्भर रॅलीवर टीका केली होती. या टीकेचा खरपूस समाचार राणे यांनी घेतला. पालकमंत्री अनिल परब मागील तीन महिन्यांत जिल्ह्यात फक्त अडीच दिवसच येऊन गेले; बाकी त्यांचा पूर्णवेळ मातोश्रीवरच गेला, असा टोला त्यांनी लगावला. निसर्ग चक्रीवादळ महिना उलटून गेला असताना त्यांनी या भागातील परिस्थितीची एकदाही पाहणी करण्यासाठी वेळ मिळाला नाही. मुंबईत बसून व्हिडिओ टाकण्याचे आणि टीका करण्याचे काम ते करत आहेत. अशाप्रकारे चाललेल्या कारभाराबाबत, भ्रष्टाचाराबाबत, आम्ही विरोधक म्हणून जर सरकारला जाब विचारला, तर त्याची उत्तरं द्यायलाच हवीत. आमचे प्रश्न म्हणजे ह्यांना टीका वाटते, म्हणून आम्ही फक्त बघत बसायचे का? असा सवाल राणे यांनी केला.
शिवसेनेचा ड्रामा लोक खपवून घेणार नाही