रत्नागिरी - 2019 या सरत्या वर्षाला निरोप देत 2020 या नवीन वर्षाचे जिल्ह्यात जल्लोषात स्वागत करण्यात आले. फटाक्यांच्या आतिषबाजीसह अनेक ठिकाणी तरुणाई, अबालवृद्ध डिजेच्या तालावर थिरकताना पहायला मिळाले.
रत्नागिरीत नववर्षाचे जल्लोषात स्वागत - ratnagiri new year celbration ratnagiri latest news
सायंकाळपासून या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी विविध बेत आखले जात होते. जिल्ह्यातील सर्वच हॉटेल्समध्ये गर्दी पाहायला मिळत होती.
सायंकाळपासून या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी विविध बेत आखले जात होते. जिल्ह्यातील सर्वच हॉटेल्समध्ये गर्दी पाहायला मिळत होती. त्यात नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जिल्ह्यात आलेल्या पर्यटकांनी समुद्रकिनारी असलेल्या रिसॉर्टला सर्वाधिक पसंती दिली होती. येथील समुद्रकिनारी असलेल्या रत्नसागर रिसॉर्टमध्ये 2020 या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी विशेष तयारी करण्यात आली होती. रात्री 12 वाजता फटाक्यांच्या आतिषबाजीसह या नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आले. यानंतर तरुण-तरुणी डिजेच्या तालावर थिरकताना पहायला मिळाले.
हेही वाचा - नवीन वर्षाच्या स्वागतासाठी 'गेट ऑफ इंडिया' येथे नयनरम्य रोषणाई