महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रत्नागिरी जिल्ह्यात आढळले नवे 46 रुग्ण; एकूण कोरोना बाधितांची संख्या 1 हजार 210 वर - ratnagiri corona latest news

गेल्या 24 तासात नव्याने प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये एकूण 46 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 1 हजार 210 इतकी झाली आहे.

रत्नागिरी कोरोना अपडेट
रत्नागिरी कोरोना अपडेट

By

Published : Jul 20, 2020, 11:57 AM IST

रत्नागिरी - जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून, जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता 1200 च्या पुढे गेली आहे. गेल्या 24 तासात नव्याने प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये एकूण 46 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 1 हजार 210 इतकी झाली आहे. तर आतापर्यंत एकूण 41 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर सक्रिय रुग्ण संख्या 443 आहे.

नव्याने सापडलेल्या रुग्णांमध्ये जिल्हा कोरोना रुग्णालय, रत्नागिरी -7 रुग्ण, घरडा, खेड 12 (यामुळे घरडा केमिकल्स मधील एकूण पॉझिटिव्हची संख्या 110 झाली), उपजिल्हा रुग्णालय, कामथे 18, उपजिल्हा रुग्णालय कळबणी 4, दापोली 2, गुहागर 3 , या रुग्णाचा समावेश आहे.

दरम्यान 18 रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 726 झाली आहे. बरे झालेल्यांमध्ये जिल्हा कोरोना रुग्णालय येथून 3, कोरोना केअर सेंटर के.के.व्ही दापोली 2, कोव्हीड केअर सेंटर घरडा 6 आणि 7 समाजकल्याण रत्नागिरी मधील आहेत.

मुंबईसह एम.एम.आर.क्षेत्र तसेच इतर जिल्ह्यातून आलेल्या व्यक्तींना होम क्वारंटाईन केले जात आहे. होम क्वारंटाईन असलेल्याची संख्या 14 हजार 301 इतकी आहे.

जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 13 हजार 753 नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 13 हजार 389 तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 1 हजार 210 अहवाल पॉजिटिव्ह आले असून 12 हजार 167 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अजून 364 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. हे नमुने रत्नागिरी येथील प्रयोगशाळेमध्ये प्रलंबित आहेत. यामध्ये घरडा केमिकल्सच्या खाजगी लॅबचे आकडे समाविष्ठ नाहीत.

ABOUT THE AUTHOR

...view details