रत्नागिरी- जिल्ह्यात सध्या दररोज कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. मंगळवारी संध्याकाळी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये आणखी 14 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 175 वर पोहोचली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात मंगळवारी आढळले आणखी 14 कोरोना पॉझिटिव्ह, एकूण रुग्णसंख्या 175 वर
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 175 झाली आहे. त्यापैकी 67 जण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत. तर आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला असून, 103 रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
जिल्हा प्रशासनाला मंगळवारी संध्याकाळी 17 जणांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये 14 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले. यामध्ये चिपळूण तालुक्यातील 6 तर राजापूर तालुक्यातील 8 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. चिपळूणमधील हे 6 रुग्ण धामेली गावातील आहेत. हे सर्वजण 19 तारखेला मुंबईतून आपल्या गावी आले होते. तर राजापूर तालुक्यातील 8 रुग्णांमध्ये दोन स्त्रिया आणि सहा पुरुषांचा समावेश आहे. यातील 4 रुग्ण कशेळी, वडदहसोळ आणि कोंडवाडी येथील आहेत. तर उर्वरित 4 रुग्ण प्रिंदावन गावातील आहेत.
त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 175 झाली आहे. त्यापैकी 67 जण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत. तर आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला असून, 103 रूग्णांवर उपचार सुरू आहेत.