महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

निसर्ग चक्रीवादळ : एनडीआरएफ टीम चिपळूणमध्ये दाखल

आपत्ती काळात लागणारी सर्व मशिनरी, इमर्जन्सी बोट, कटर, रोप अशा सर्व साहित्यासह एनडीआरएफ टीम चिपळूण येथे दाखल झाली आहे. आज येथील समुद्र किनारपट्टीची पाहणी करण्यात येणार आहे.

nisarg cyclone latest update  nisarg cyclone news  nisarg cyclone ratnagiri  ratnagiri latest news  रत्नागिरी लेटेस्ट न्युज  निसर्ग चक्रीवादळ लेटेस्ट अपडेट  निसर्ग चक्रीवादळ न्युज
निसर्ग चक्रीवादळ : एनडीआरएफ टीम चिपळूणमध्ये दाखल, किनारपट्टीचा करणार पाहणी

By

Published : Jun 2, 2020, 3:49 PM IST

चिपळूण ( रत्नागिरी) -येत्या ३ जून रोजी कोकण किनारपट्टीवर धडकणाऱ्या निसर्ग चक्रीवादळामुळे मोठी हानी होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने एनडीआरएफची टीम चिपळूणमध्ये दाखल झाली आहे. यामध्ये १८ जवानांसोबत २ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

निसर्ग चक्रीवादळ : एनडीआरएफ टीम चिपळूणमध्ये दाखल, किनारपट्टीचा करणार पाहणी

आपत्ती काळात लागणारी सर्व मशिनरी, इमर्जन्सी बोट, कटर, रोप अशा सर्व साहित्यांसह एनडीआरएफ टीम चिपळूण येथे दाखल झाली आहे. हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे, ३ तारखेला या कोकण किनारपट्टीवर येणाऱ्या वादळामुळे संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी व घरातून बाहेर पडू नये. त्यासंदर्भात सावध तसेच घरी राहण्याच्या सूचना तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांनी दिल्या आहेत.

निसर्ग चक्रीवादळ आणि अतिवृष्टीच्या दरम्यान अशी घ्या काळजी...

  1. मच्छीमार व अन्य व्यक्तींनी समुद्रामध्ये जाऊ नये.
  2. 3 जून रोजी अतिवृष्टीमुळे घरामध्ये पाणी घुसणार नाही, याची खात्री असल्यास घरातच सुरक्षित रहावे. घराच्या बाहेर पडू नये.
  3. आपले घर मोडकळीस आलेल्या स्थितीमध्ये असेल किंवा कच्च्या स्वरुपाचे असेल तर तत्काळ उंचावरील ठिकाणी किंवा सुरक्षित स्थळी आवश्यक साधनसामग्री सोबत घेऊन स्थलांतरीत व्हावे.
  4. घराच्या अवती-भवती वादळामुळे कोणत्या वस्तू, विजेचे खांब किंवा तारा, झाडे पडण्याची शक्यता असल्यास अशा वस्तूंपासून लांब राहावे.
  5. आपले पशुधन व अन्य पाळीव प्राणी यांना अगोदरच सुरक्षितस्थळी हलवावे.
  6. आपल्याजवळ केरोसीनवर चालणारे दिवे (कंदिल) बॅटरी, गॅसबत्ती, स्टोव्ह, काडीपेटी या वस्तू उजेड व खाद्यपदार्थ बनवण्यासाठी उपलब्ध ठेवाव्यात.
  7. हवामान खात्याकडून मिळणारे इशारे समजण्यासाठी जवळ रेडिओ बाळगावा. त्यासाठी काही जास्त बॅटऱ्या जवळ ठेवाव्यात.
  8. सोबत आवश्यक अन्नधान्य, पिण्याचे पाणी, औषधे जवळ ठेवावे.

ABOUT THE AUTHOR

...view details