रत्नागिरी- तिवरे धरण दुर्घटनेतील 23 पैकी 16 मृतदेह सापडले आहेत. एनडीआरएफचे जवान, स्थानिक नागरिक तसेच काही स्वयंसेवी संस्थाचे कार्यकर्ते बेपत्ता नागरिकांचा शोध घेत आहेत. शेवटचा मृतदेह सापडेपर्यंत शोधमोहीम सुरू ठेवणार असल्याची माहिती एनडीआरएफचे सेकंडिंग कमांडर सचिदानंद गावडे यांनी दिली आहे.
शेवटचा मृतदेह सापडेपर्यंत शोधकार्य सुरूच ठेवणार - एनडीआरएफ - नागरिक
एनडीआरएफचे जवान, स्थानिक नागरिक तसेच काही स्वयंसेवी संस्थाचे कार्यकर्ते बेपत्ता नागरिकांचा शोध घेत आहेत. पावसामुळे शोधकार्यात अडचणी येत आहेत.
शोधकार्य करताना नागरिकांसह जवान
पावसामुळे शोधकार्यात अडचणी येत आहेत. गुरुवारपासून एनडीआरएफचे जवान शोधकार्य करत आहेत. आज मृतांच्या नातेवाईकांना प्रशासनाकडून मदत देण्यात आली आहे. तर बेघर नागरिकांचे पुनर्वसनही करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी चव्हाण यांनी दिली आहे.