रत्नागिरी- चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण दुर्घटना भीषण होती. याबाबत केंद्र सरकारकडून जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू. तसेच लवकरात लवकर चौकशी करून योग्य कारवाई करण्याचे आश्वासन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले. आज त्यांनी तिवरे धरण दुर्घटनेतील पीडित कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी ते बोलत होते.
शरद पवारांनी घेतली तिवरे धरण दुर्घटनाग्रस्तांची भेट; आरोपींविरोधात कारवाई करण्याचे आश्वासन - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार
पवार यांनी तिवरे धरणाची पाहणी केली. त्यानंतर ग्रामस्थांची चर्चा देखील केली. तसेच राष्ट्रवादी वेल्फेअर फंडातून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी १ लाख रुपयांची मदत जाहीर केली. तसेच मृतांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.
काय आहे तिवरे धरण दुर्घटना? वाचण्यासाठी इथं क्लिक करा...
पवार यांनी तिवरे धरणाची पाहणी केली. त्यानंतर ग्रामस्थांची चर्चा देखील केली. तसेच राष्ट्रवादी वेलफेअर फंडातून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी १ लाख रुपयांची मदत जाहीर केली. तसेच मृतांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. या दुर्घटनेतील पीडित कुटुंबांमधील विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही. त्यासाठी सर्वोतोपरी मदत करणार असल्याचे पवार यांनी सांगितले. तसेच या दुर्घटनेची भीषणता केंद्र सरकारला देणार असल्याचे पवार म्हणाले. यावेळी आमदार भास्कर जाधव, जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, शेखर निकम, पंचायत समिती सभापती पूजा निकम आदी उपस्थित होते.