रत्नागिरी - भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गेलेल्या शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंवर टिकेची झोड उठलेली पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी हाच मुद्दा पकडत उद्धव ठाकरे यांच्यावर आज रत्नागिरीत तोफ डागलीय. एकेकाळी भाजपवर आगपाखड करणारी शिवसेना आता गळ्यात गळे घालत असल्याचे जाधव म्हणाले.
आज महाराष्ट्र पूर्णपणे दुःखी झाला; राष्ट्रवादीच्या भास्कर जाधवांची उद्धव ठाकरेंवर उपरोधी टीका - lok sabha
२०१४ मध्ये अमित शाह आणि नरेंद्र मोदी सेनेच्या विरोधात सभा घेत होते, तेव्हा उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला साथ घालत सांगत होते, महाराष्ट्रामध्ये अफजल खानाच्या फौज आल्या आहेत.
अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांची अफजलखानाची फौज म्हणणारे उद्धव ठाकरे त्यांच्याच भेटीली गेले आहेत. २०१४ मध्ये अमित शाह आणि नरेंद्र मोदी सेनेच्या विरोधात सभा घेत होते, तेव्हा उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला साथ घालत सांगत होते, महाराष्ट्रामध्ये अफजल खानाच्या फौज आल्या आहेत. त्यावेळी शिवसैनिकांनी छातीचा कोट करून आणि महाराष्ट्राच्या जनतेनेही भावनिक साथ दिली होती. आता त्याच अफजलखानाच्या भेटीला शिवरायांच्या मातीतला स्वाभिमान सांगणारा नेता जात आहे. त्यामुळे महाराष्ट्र दुःखी झाल्याची उपरोधी टीका भास्कर जाधव यांनी केली.