रत्नागिरी - श्रीक्षेत्र नाणीज येथील नरेंद्र महाराज संस्थानने कोरोनावरील उपाययोजना व प्रतिबंध करण्यासाठी रत्नागिरी पोलीस दलाला दहा लाख रुपयांचा निधी दिला आहे. निधीचा धनादेश रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्याकडे संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनोद भागवत व उपकार्यकारी अधिकारी राजन बोडेकर यांनी सुपूर्द केला. यावेळी रत्नीगिरी जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल विभूते उपस्थित होते.
नरेंद्र महाराज संस्थानकडून रत्नागिरी पोलीस दलाला दहा लाख रुपयांचा निधी - रत्नागिरी नरेंद्र महाराज संस्थान मदत न्युज
रत्नागिरी पोलीस दलाकडून अशा निधीबाबतचे आवाहन करण्यात आले होते. त्यासाठी नरेंद्र महाराज संस्थानने केलेल्या सहकार्याबद्दल पोलीस अधीक्षकांनी आभार मानले. संस्थानने यापूर्वी कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी पंतप्रधान निधीला ५२ लाख व मुख्यमंत्री निधीला प्रत्येकी ५० लाख याप्रमाणे, एक कोटी २ लाख रुपये निधी दिला आहे.
रत्नागिरीत कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. त्यातून पोलिसांवरील कामाचा ताणही वाढतो आहे. या पार्श्वभूमीवर त्यांची सुरक्षादेखील तेवढीच महत्वाची आहे. यासाठी संस्थानने हे सहकार्य केले आहे. या निधीतून जिल्ह्यातील पोलीस अधिकारी, कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय यांच्यासाठी मास्क, सॅनिटायझर, हातमोजे अशा आवश्यक साहित्याची खरेदी व वाटप करण्यात येणार आहे. साधारण १५०० पोलिसांना व त्यांच्या कुटुंबीयांना हे साहित्य दिले जाणार आहे.
रत्नागिरी पोलीस दलाकडून अशा निधीबाबतचे आवाहन करण्यात आले होते. त्यासाठी संस्थानने केलेल्या सहकार्याबद्दल पोलीस अधीक्षकांनी आभार मानले. संस्थानने यापूर्वी कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी पंतप्रधान निधीला ५२ लाख व मुख्यमंत्री निधीला प्रत्येकी ५० लाख याप्रमाणे, एक कोटी २ लाख रुपये निधी दिला आहे. तसेच गोरगरीब, गरजू कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणात वाटप करण्यात आले आहे. मुंबईतील ५० पोलीस ठाण्यात सॅनिटायझर स्टँड व सॅनिटायझर दिले आहे.