रत्नागिरी- मुंबईतल्या राम नवमीच्या कार्यक्रमात 'भाड मे गई न्याय व्यवस्था और भाड मे गई आचारसंहिता' असे म्हणणाऱ्या शिवसेना खासदार सजंय राऊत यांचा समाचार खासदार नारायण राणेंनी घेतला आहे. राऊत यांच्या बोलण्याचा अर्थ हे कायदे पाळत नाहीत, उर्मट झालेत, उन्मत झालेत याचा प्रत्यय आणून देतात अशी टीका राणे यांनी केली.
संजय राऊत यांचे वक्तव्य म्हणजे त्यांच्या उर्मट, उन्मतपणाचा प्रत्यय - नारायण राणे - Ratnagiri
मुंबईतल्या राम नवमीच्या कार्यक्रमात 'भाड मे गई न्याय व्यवस्था और भाड मे गई आचारसंहिता' असे म्हणणाऱ्या शिवसेना खासदार सजंय राऊत यांचा समाचार खासदार नारायण राणेंनी घेतला आहे.
संपादीत छायाचित्र
संजय राऊत यांचे बोलणे नियमबाह्य आहे. भारतीय राज्यघटनेनुसार लोकशाहीमध्ये या निवडणुका होत आहेत. निवडणूक आयोगाने घटनेनुसारच आचारसंहिता लागू केली आहे. संजय राऊत माध्यमात अशा प्रकारची वक्तव्ये करून आपले हसं करून घेतात हे सर्वांना माहित असल्याचे सांगत नारायण राणेंनी संजय राऊत यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.