रत्नागिरी -चिपळूणमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे या भागात अतोनात नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे कोकणातील अनेक भागात दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहे. या पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरयांनी कोकण मधली पूरग्रस्त भागांना भेट देऊन सर्व परिस्थितीची पाहणी केली आहे.
'तळीयेतील पूरग्रस्तांना पंतप्रधान आवास योजनेतून मिळणार घरं'
पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात पावसाने थैमान घातल्याने अनेकांचे जीव गेले. खासकरून रायगड येथील महाड तालुक्यात असणाऱ्या तळीये गावात दरड कोसळून आतापर्यंत 52 गावकऱ्यांचा जीव गेला आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दुर्घटनाग्रस्तांना पंतप्रधान आवास योजनेतर्गंत सर्वांना घरे बांधून देण्यात येणार अशी घोषणा त्यांनी केली आहे.