महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

..हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार, नाना पटोलेंचा राज्यपालांवर निशाणा - nana on rajyapal

राज्यपाल भवन हे भाजपचे कार्यालय झाले आहे. त्याठिकाणी एका पक्षाचे राजकारण चालते. अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

Nana Patole criticizes Governor
Nana Patole criticizes Governor

By

Published : May 23, 2021, 2:53 PM IST

Updated : May 23, 2021, 3:02 PM IST

रत्नागिरी -राज्यपाल भवन हे भाजपचे कार्यालय झाले आहे. त्याठिकाणी एका पक्षाचे राजकारण चालते. अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. ते आज रत्नागिरी दौऱ्यावर आले असता बोलत होते.

राज्यपाल हे कुणा एका पक्षाचे नसतात - नाना पटोले

यावेळी पटोले म्हणाले की, कधी नव्हे असे राज्यपाल महाराष्ट्राला मिळाले आहेत. महाराष्ट्राची परंपरा ही आगळीवेगळी आहे. राज्यपाल पदाची एक वेगळी गरिमा आहे. राज्यपाल हे कुणा एका पक्षाचे नसतात. राज्यपाल हा राज्यातील सर्व जनतेचा असावा, असं म्हणत नाना पटोले यांनी राज्यपालांवर निशाणा साधला.

नाना पटोलेंचा राज्यपालांवर निशाणा
हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार - नाना पटोलेदरम्यान सध्या राज्यपाल नियुक्त आमदारांबाबत जी नावे पाठविण्यात आली आहेत. ती नियमाला धरून पाठवण्यात आली आहेत. जर त्याच्यात काही चुकलं असेल तर राज्यपालांनी कळवलं पाहिजे. त्याच्यात काही त्रुटी असेल तर राज्य सरकार दुरुस्त करून देईल. मात्र त्यांची नियुक्ती थांबवणे हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार आहे. भाजपने या प्रकारचे कृत्य करू नये, अशी टीका नाना पटोले यांनी यावेळी केली.
Last Updated : May 23, 2021, 3:02 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details