महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भविष्यात धर्माच्या नावाने राजकरण केलं तर तरुण यांना माफ करणार नाही; नाना पटोलेंची भाजपावर टीका - nana patole visit to chiplun

भाजपाने धर्माच्या नावाने भरपूर राजकारण केलं, पण भविष्यात धर्माच्या नावाने राजकरण केलं तर तरुण यांना माफ करणार नाही, अशी टीका नाना पटोले यांनी यावेळी भाजपावर केली. यावेळी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप, माजी आमदार हुस्नबानो खलिफे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव आदी उपस्थित होते.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

By

Published : Aug 4, 2021, 10:06 PM IST

रत्नागिरी - राम मंदिराचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. याबाबत चिपळूणमध्ये पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, भाजपाने धर्माच्या नावाने भरपूर राजकारण केलं, पण भविष्यात धर्माच्या नावाने राजकरण केलं तर तरुण यांना माफ करणार नाही, अशी टीका नाना पटोले यांनी यावेळी भाजपावर केली. यावेळी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप, माजी आमदार हुस्नबानो खलिफे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव आदी उपस्थित होते.

भविष्यात धर्माच्या नावाने राजकरण केलं तर तरुण यांना माफ करणार नाही

यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले की, राम मंदिराला काँग्रेसनं कधीच विरोध केला नाही, राम मंदिराचं कुलुप आदरणीय राजीव गांधी उघडलं होतं. त्यानंतर भाजपला जाग आली. दरम्यान आता बेरोजगारांच्या हाताला कामाची गरज आहे. त्याच्यावर आज पंतप्रधान आणि भाजप का बोलत नाही. बेरोजगारंबद्दल ते का बोलत नाहीत. धर्माच्या नावाने भाजपने खूप राजकरण केलं, आता भविष्यात धर्माच्या नावाने राजकरण केलं तर तरुण यांना माफ करणार नाही, अशी टीका नाना पटोले यांनी यावेळी केली.

राज्यपालांनी खुर्ची सोडावी आणि आणि भाजपाचा कार्यकर्ता म्हणून वागावं -

दरम्यान भाजप प्रेरीत राज्यपाल संविधानाची पायमल्ली करत आहेत, राज्याच्या कॅबिनेट बैठकीमध्ये सुद्धा याबद्दलची नाराजी व्यक्त झाली आहे. राज्यपालांनी खुर्ची सोडावी आणि आणि भाजपचा कार्यकर्ता म्हणून वागावं अशी टीका नाना पटोले यांनी यावेळी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details