रत्नागिरी -गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांच्या गाड्यांची मोठी गर्दी रत्नागिरीच्या प्रवेशद्वारावर म्हणजेच कशेडी घाटात दिसून येत आहे. कशेडी घाटात चेक पोस्ट असून आरोग्य तपासणी केंद्र सुद्धा आहे. त्यामुळे कशेडी घाटात गाड्यांची रांगा लागल्याचे पाहायला मिळत आहे. यावर्षी गणेशोत्सव 22 ऑगस्टपासून सुरू होत आहे. गणेशोत्सव आणि कोकणी माणूस यांचं जिव्हाळ्याचं नातं आहे. या सणासाठी परगावी असणारा चाकरमानी हमखास गावी येतोच. यावर्षी मात्र गणेशोत्सवावर कोरोनाचं सावट आहे. त्यामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांनी काही दिवस अगोदर येऊन क्वारंटाईन व्हावं, अशा सूचना अनेक ग्रामपंचायतींनी केल्या आहेत.
गणेशोत्सवासाठी हजारो चाकरमानी कोकणच्या दिशेने; कशेडी चेक पोस्टवर गाड्यांच्या रांगा - रत्नागिरी कोकण न्यूज
गणेशोत्सवावर कोरोनाचं सावट आहे. त्यामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांनी काही दिवस अगोदर येऊन क्वारंटाईन व्हावं, अशा सूचना अनेक ग्रामपंचायतींनी केल्या आहेत.
गणेशोत्सवासाठी हजारो चाकरमानी कोकणच्या दिशेने; कशेडी चेक पोस्टवर गाड्यांच्या रांगा
चाकरमानी 7 ऑगस्टपर्यंत कोकणात आले तरच 22 तारखेला क्वारंटाईन होऊन बाहेर पडू शकतात. या गणितामुळे आतापासूनच चाकरमान्यांनी कोकणाकडे धाव घेतली आहे. त्यामुळेच जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या कशेडी घाटात चाकरमान्यांच्या गाड्यांची रांग लागलेली दिसून येत आहे. जवळपास 2 ते 3 किलोमीटरपर्यंत ही रांग आहे. कशेडी घाटात चेक पोस्ट तसेच आरोग्य तपासणी केंद्र आहे. त्यामुळे सध्या इथे गर्दी असल्याचे चित्र आहे.