रत्नागिरी - जगबुडी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने मध्यरात्री एक वाजता जगबुडी पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्ग ६ तास ठप्प झाला होता. पाणी ओसरल्यानंतर आज सकाळी साडेसहा वाजता ही वाहतूक धिम्या गतीने सुरू करण्यात आली आहे.
जगबुडी पूल पाण्याखाली गेल्याने मुंबई-गोवा महामार्ग 6 तास ठप्प; वाहतूक हळूहळू पूर्वपदावर
जगबुडी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने मध्यरात्री एक वाजता जगबुडी पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्ग ६ तास ठप्प झाला होता.
खेड, दापोली, मंडणगड, चिपळूण या तालुक्यांना शनिवारी मुसळधार पावसाने झोडपून काढले. त्यामुळे खेड, चिपळूण बाजारपेठामध्ये पाणी शिरले होते. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीतही वाढ झाली. चिपळूणमधील वाशिष्ठी पुलावरून जाणारी मुंबई-गोवा महामार्गाची वाहतूक फरशी तिठा येथून बायपास मार्गे वळविण्यात आली होती. तर खेडमधील जगबुडी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने जगबुडी पुलावरून होणारी मुंबई-गोवा महामार्गाची वाहतूक मध्यरात्री एक वाजता बंद करण्यात आली.
सध्या पावसाचा जोर ओसरल्याने नद्यांची पाणी पातळी कमी झाली आहे. परिणामी जगबुडी पुलावरील पाणी ओसरल्याने आज सकाळी साडेसहा वाजता वाहतूक धिम्या गतीने सुरू करण्यात आली.