रत्नागिरी - सध्या कोरोनामुळे उद्धभवलेल्या गंभीर परिस्थितीमुळे देशभरातील नागरी विमान वाहतूक, पर्यटन तसेच हॉटेल व्यवसाय यांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक सहाय्य करावे, अशी मागणी खासदार विनायक राऊत यांनी केली आहे. याबाबत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे.
विमान तसेच हॉटेल व्यवसायाला भरीव आर्थिक मदत करा, विनायक राऊतांचे पंतप्रधानांना पत्र - विमान व्यवसायाला आर्थिक मदतीबाबत राऊत
केंद्र सरकारने इतर अनेक उद्योगांना न्याय दिलेला आहे. तसाच न्याय हॉटेल व्यवसाय, नागरी विमान वाहतूक, पर्यटन व्यवसायाला सरकारने मोठा हातभार लावण्याची आवश्यकता आहे, असे खासदार विनायक राऊत म्हणाले. त्यासाठी पंतप्रधानांना पत्र लिहिल्याचे त्यांनी सांगितले.
![विमान तसेच हॉटेल व्यवसायाला भरीव आर्थिक मदत करा, विनायक राऊतांचे पंतप्रधानांना पत्र MP vinayak raut latest news MP vinayak raut letter to pm lockdown effect on airlines lockdown effect on hotel business खासदार विनायक राऊत लेटेस्ट न्युज विनायक राऊतांचं मोदींना पत्र विमान व्यवसायाला आर्थिक मदतीबाबत राऊत हॉटेल व्यवसायावर लॉकडाऊनचा परिणाम](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7261831-thumbnail-3x2-mum.jpg)
कोरोनामुळे गेले दोन महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू आहे. या लाॅकडाऊनमुळे अनेक व्यवसाय अडचणीत आले आहेत. सध्या कोरोनामुळे उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीमुळे देशभरातील नागरी विमान वाहतूक, पर्यटन तसेच हॉटेल व्यवसाय अडचणीत आले आहेत. करोडो लोकांचा रोजगार यावर अवलंबून आहे. तसेच त्यातच लाॅकडाऊनमुळे पर्यटनावर अलवंबून असलेल्या उद्योगांची सर्वात मोठी अडचण झाली. या उद्योगातील अनेकांचे रोजगार धोक्यात आले आहेत. त्यामुळे रोजगार निर्माण करणाऱ्या या क्षेत्राला सरकारी अर्थसहाय्य मिळण्याची आवश्यकता आहे. केंद्र सरकारने इतर अनेक उद्योगांना न्याय दिलेला आहे. तसाच न्याय हॉटेल व्यवसाय, नागरी विमान वाहतूक, पर्यटन व्यवसायाला सरकारने मोठा हातभार लावण्याची आवश्यकता आहे, असे खासदार विनायक राऊत म्हणाले. त्यासाठी पंतप्रधानांना पत्र लिहिल्याचे त्यांनी सांगितले.