महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Nilesh Rane Criticized Vinayak Raut : खासदार विनायक राऊत यांनी कोकणचे नाव खराब केले - निलेश राणे - Allegations Against Vinayak Raut

शिवसेना पक्षाकडून सध्या राज्यभर मेळावे घेण्याचे सत्र ( Shiv Sena Party is Holding Rallies ) चालू आहे. कोल्हापूर येथे खासदार विनायक राऊत ( MP Vinayak Raut ) यांनी शिवसेनेचा जिल्हा मेळावा घेतला होता. त्यावेळी त्यांनी आमदार राजेश क्षीरसागर ( MLA Rajesh Kshirsagar ) यांच्यावर आरोप केले होते. त्याला पलटवार म्हणून क्षीरसागर यांनी विनायक राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले होते. हाच धागा पकडून नीलेश राणेंनी ट्विट करीत विनायक राऊतांवर खरमरीत टीका केली आहे. ( Nilesh Rane Tweeted & Severely Criticized Vinayak Raut )

Nilesh Rane and Vinayak Raut charge-counter-charge
नीलेश राणे आणि विनायक राऊत आरोप-प्रत्यारोप

By

Published : Jul 17, 2022, 9:43 AM IST

Updated : Jul 17, 2022, 10:17 AM IST

रत्नागिरी :शिवसेनेचे राज्यभर मेळावे सुरू ( Shiv Sena Party is Holding Rallies ) असताना शिवसेना नेते आणि बंडखोर आमदार यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. कोल्हापूर येथे शिवसेना पक्षाचा मेळावा ( Shiv Sena Party is Holding Rallies ) विनायक राऊत यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यावेळी खासदार विनायक राऊत यांनी राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर ( MLA Rajesh Kshirsagar ) यांच्यावर आरोप केले होते. त्यावर आमदार राजेश क्षीरसागर यांनी पलटवार करीत शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्याचाच धागा पकडून नीलेश राणे यांनी विनायक राऊत यांच्यावर शेलक्या शब्दात खरमरीत टीका केली आहे. ( Shiv Sena Party is Holding Rallies ) ( Nilesh Rane Criticized Vinayak Raut )

नीलेश राणेंनी केली खरमरीत टीका : यावरून भारतीय जनता पक्षाचे नेते माजी खासदार नीलेश राणेसुद्धा आक्रमक झाले असून, ट्विटद्वारे त्यांनी विनायक राऊत यांचा समाचार घेतला आहे. "आमदार राजेश क्षीरसागर यांनी खासदार विनायक राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. विनायक राऊत निवडणूक असो व कार्यक्रम त्याला ‘बॅग‘ द्याव्या लागतात. कोकणाचे नाव खराब केले. या माणसाने, त्या बॅग स्वतःसाठी होत्या की मातोश्रीसाठी हे विनायक राऊत यांनी स्पष्ट करावे." असे त्यांनी ट्विट केले आहे.

नीलेश राऊत यांचे ट्विट

कोल्हापूर येथे घेतला होता शिवसेनेचा मेळावा : कोल्हापूर येथे रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी शिवसेनेचा जिल्हा मेळावा घेतला. त्यावेळी त्यांनी शिवसेनेचे नेते राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यावर आरोप केले होते. त्याचे पडसाद कोल्हापूर येथे उमटले असतानाच राजेश क्षीरसागर यांनीही जोरदार पलटवार करताना विनायक राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले. विनायक राऊत ज्या ठिकाणी जातात. त्या ठिकाणी पैसे घेतल्याशिवाय जातं नाहीत, कार्यक्रम असो आगार कोणताही कार्यक्रम, त्यांची 'बॅग' तयार ठेवावी लागते, असे थेट शरसंधान केले आहे.

आमदार राजेश क्षीरसागर यांनी केला आरोप : आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले की, निवडणूक असो वा कार्यक्रम, शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांना ‘बॅग‘ द्याव्या लागतात. ते कोठेही गेले तरी अगोदर त्यांच्या बॅगेची व्यवस्था करावी लागते. ते कोठेही पैसे घेतल्याशिवाय जात नाहीत. शिवसेना मेळाव्यात होणारे आरोप-प्रत्यारोपामुळे वातावरण चांगलेच तापले आहे.

कोल्हापूरच्या शिवसेना मेळाव्यात केला होता आरोप : "क्षीरसागर म्हणजे बैईमानीची लागलेली कीड' अशी जोरदार टीका विनायक राऊत यांनी आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावर केली होती. राऊत म्हणाले की, कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीतच बेईमानीची लागलेली कीड मी स्वतः अनुभवली होती. घरी जेवायला बोलावून खर्च दुसऱ्याकडून करायचा ही क्षीरसागरांची वृत्ती आहे. त्यांनी मला आणि नाना पटोलेंना घरी घातलेल्या जेवणाचा खर्च हा काँग्रेसचे सतेज उर्फ बंटी पाटील यांच्याकडून घेतला असल्याचाही आरोप त्यांनी यावेळी त्यांच्यावर केला होता. शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेचेही त्यांनी खरपूस समाचार घेतला होता.

हेही वाचा :maharashtra political crisis : माजी मंत्री विजय शिवतारेंची शिवसेनेतून हकालपट्टी

Last Updated : Jul 17, 2022, 10:17 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details