रत्नागिरी - शिवसेनेच्याच पुढाकाराने हद्दपार केलेल्या नाणार रिफायनरी प्रकल्पाची जाहिरात चक्क शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना पेपरमध्ये पहिल्या पानावार छापून आल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे या प्रकल्पाबाबत शिवसेनेची नेमकी भूमिका काय आहे, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे पहिल्याच पानावर ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीबाबत लोकसभेचे खासदार विनायक राऊत यांना विचारलं असता त्यांनी मात्र याबाबत लंगडं समर्थन केलं आहे. ते शनिवारी रत्नागिरीत बोलत होते.
नाणार रिफायनरीची जाहिरात चक्क 'सामना'त; शिवसेनेची भूमिका बदलली? - advertisement of nanar refinery in samana news paper
शिवसेनेच्याच पुढाकाराने हद्दपार केलेल्या नाणार रिफायनरी प्रकल्पाची जाहिरात चक्क शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना पेपरमध्ये पहिल्या पानावार छापून आल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे या प्रकल्पाबाबत शिवसेनेची नेमकी भूमिका काय आहे असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
नाणार रिफायनरीची जाहिरात चक्क 'सामना'त; शिवसेनेची भूमिका बदलली?
हेही वाचा -
संजय काकडेंचं राज्यसभेच तिकीट कापण्यावरुन तटकरे, राऊतांची खोचक टीका
राऊत म्हणाले की, सामना हे शिवसेनेचे जरी मुखपत्र असले तरी हे एक वृत्तपत्र आहे. वृत्तपत्रांमध्ये इतर जाहिराती येतात तशीच ती जाहिरात आली असेल. मात्र, कंपनी जरी अशा जाहिराती देत असली तरी ते स्वत:च्या मनात मांडे खात असतील. पण सरकारने हा प्रकल्प केव्हाच गुंडाळलेला आहे. जोपर्यंत स्थानिक जनता हा प्रकल्पासाठी होकार देत नाही तोपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या प्रकल्पाबाबत कोणताही विचार करणार नाहीत, असे खासदार राऊत यावेळी म्हणाले.
Last Updated : Feb 15, 2020, 3:27 PM IST