महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

MP Vinayak Raut : कर्नाटकच्या मंत्र्यांच्या तुलनेत महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ पुचाट; विनायक राऊतांची खोचक टीका - Vinayak Raut Criticized Cabinet of Maharashtra

कर्नाटकच्या मंत्र्यांच्या तुलनेत महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ अत्यंत पुचाट वृत्तीचे असल्याची खोचक टीका ( Vinayak Raut Criticized Cabinet of Maharashtra ) खासदार विनायक राऊत यांनी केली. कर्नाटक सीमावादप्रश्नी त्यांनी महाराष्ट्र सरकारच्या वेळकाढूपणावर भाष्य ( MP Vinayak Raut Today Criticized on State Government ) केले. तसेच, त्यांनी शिंदे गटातील मंत्र्यांचा भ्रष्टाचार लवकरच बाहेर ( Karnataka Legislative Assembly Immediately Passed Resolution ) येईल, असे रत्नागिरी येथे माध्यमांशी बोलताना सांगितले.

MP Vinayak Raut Criticized Cabinet of Maharashtra
कर्नाटकच्या मंत्र्यांच्या तुलनेत महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ पुचाट; विनायक राऊतांची खोचक टीका

By

Published : Dec 27, 2022, 10:22 PM IST

कर्नाटकच्या मंत्र्यांच्या तुलनेत महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ पुचाट; विनायक राऊतांची खोचक टीका

रत्नागिरी :कर्नाटकच्या मंत्र्यांच्या तुलनेत महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ अत्यंत पुचाट वृत्तीचे ( Vinayak Raut Criticized Cabinet of Maharashtra ) आहे, अशी टीका खासदार विनायक राऊत यांनी आज राज्य सरकारवर केली आहे, ते आज रत्नागिरीत बोलत ( MP Vinayak Raut Today Criticized on State Government ) होते. यावेळी विनायक राऊत म्हणाले, कर्नाटकच्या विधानसभेने ताबडतोब ठराव केला आणि आपल्या मंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी आधी दिल्लीवारी केली. दिल्लीकरांशी लोटांगण घातले ( Karnataka Legislative Assembly Immediately Passed Resolution ) आणि आता येऊन कर्नाटकच्या विरोधात ठराव केला. विरोधी पक्षांनी जर नेटा लावला नसता, तर या सरकारने तो ठराव मांडला पण नसता अशी टीका खासदार राऊत यांनी केली आहे.

'या' सर्व नेत्यांचे भ्रष्टाचार आता बाहेर येणारदरम्यान अब्दुल सत्तार, संजय राठोड किंवा उद्योग मंत्री उदय सामंत या सर्व नेत्यांचे भ्रष्टाचार आता बाहेर येताहेत. सत्तेचा वापर केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी ज्यांनी केला आहे, त्यांना जनतेच्या न्यायालयात जावे लागेल. पण, त्यांना खऱ्या अर्थाने मंत्रिमंडळातून हाकलून देण्याची आवश्यकता आहे, असेही राऊत यावेळी म्हणाले.

शंभूराज देसाईंची बरीच प्रकरणे बाहेर येतील, असा गौप्यस्फोटदरम्यान, शंभूराज देसाईंची बरीच प्रकरणे बाहेर येतील, आता अजून थोडे दिवस थांबा असे सूचक विधानही राऊत यांनी केले आहे. आता बॉम्ब फुटायला लागलेत, त्याच्यातून आधी फडणवीस वाचताहेत का बघा, हिम्मत असेल तर अजून एक आठवडा अधिवेशन घेऊन दाखवावे, असे आव्हानही खासदार राऊत यांनी दिले आहे.

अनिल देशमुख यांच्या जामिनाबाबत न्यायालयाचे मानले आभारदरम्यान, अनिल देशमुख यांच्या जामिनाबाबत बोलताना खा. राऊत म्हणाले की, न्यायदेवता अजूनही देवतेच्या रूपात आहेत. त्यामुळे आज अनिल देशमुख यांना आज न्याय मिळाला, त्याबद्दल न्यायदेवतेचे आम्ही आभार मानतो.

ABOUT THE AUTHOR

...view details