रत्नागिरी :गुजरातमध्ये पुन्हा एकदा भाजपचे सरकार येईल. मात्र खूप मोठा सेटबॅक तिथे त्यांना बसेल, असे चित्र आहे. असे विधान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव आणि कोकणातील खासदार विनायक राऊत यांनी केले आहे, ते आज रत्नागिरीत बोलत होते. राज ठाकरे यांना वातावरण चांगले आहे, पण त्यांच्या पक्षाला मात्र कोकणातील वातावरण अजिबात पोषक ठरणार (Raj Thackeray on Konkan tour) नाही. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना त्यांच्या कोकण दौऱ्यावरून खासदार विनायक राऊत यांनी टोला लगावला (MP Vinayak Raut criticized Raj Thackeray) आहे.
MP Vinayak Raut : राज ठाकरेंच्या पक्षाला कोकणातील वातावरण अजिबात पोषक ठरणार नाही - खासदार विनायक राऊत
राज ठाकरे यांना कोकणातील वातावरण चांगले आहे, पण त्यांच्या पक्षाला मात्र कोकणातील वातावरण अजिबात पोषक ठरणार (Raj Thackeray on Konkan tour) नाही. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना त्यांच्या कोकण दौऱ्यावरून खासदार विनायक राऊत यांनी टोला लगावला (MP Vinayak Raut criticized Raj Thackeray) आहे.
मंत्रिमंडळ विस्तार :यावेळी खासदार विनायक राऊत राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत होत असलेल्या चर्चांवर देखील भाष्य केले. मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे मला अजिबात वाटत नाही. मंत्रिमंडळ विस्तार हा केवळ वावड्या पिकवल्या जातात, पळून जाणाऱ्या गद्दारांना थांबविण्यासाठी, विस्तार करू म्हणून वेगवेगळ्या प्रकारे त्यांना आमिषे दाखविली जातात. पण प्रत्यक्षात विस्तार काही होणार नाही, असे खासदार विनायक राऊत यावेळी म्हणाले. दरम्यान उद्धवजी ठाकरे यांनी महिला मुख्यमंत्र्बांबाबत चांगली सूचना केलेली आहे. महाराष्ट्रामध्ये सक्षम महिला मुख्यमंत्री मिळालेल्या नाहीत, ते मिळण्याची आवश्यकता आहे. शिवसेना-महाविकास आघाडीकडून तसा प्रयत्न होत असेल, तर महाराष्ट्रातल्या महिलांचा तो सर्वोच्च बहुमान असेल, असे खासदार विनायक राऊत यावेळी (MP Vinayak Raut criticized) म्हणाले.
कोकण हा शिवसेनेचाच बालेकिल्ला :राज ठाकरे यांना वातावरण चांगले आहे, पण त्यांच्या पक्षाला मात्र कोकणातील वातावरण अजिबात पोषक ठरणार नाही. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना त्यांच्या कोकण दौऱ्यावरून खासदार विनायक राऊत यांनी टोला लगावला आहे. कोकण हा शिवसेनेचाच बालेकिल्ला आहे. या बालेकिल्ल्यामध्ये यापूर्वी सुद्धा अनेक मोठमोठी मंडळी येऊन गेलेली आहेत. परंतु कोकणी माणसाने बाळासाहेबांवर आणि उद्धव साहेबांवर असलेले प्रेम कायम ठेवलेले आहे. भविष्यातही ते कायम राहील, असे खासदार विनायक राऊत म्हणाले. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोकण दौऱ्यावर आहेत, त्यांचे स्वागत आहे. कोकणातील वातावरण सुद्धा खूप चांगले आहे, या वातावरणाचा आणि कोकणातील जेवणाचा त्यांनी आस्वाद घ्यावा. आणि आपली तब्येत चांगली कशी होईल यादृष्टीने त्यांनी पाहावे. त्यांना वातावरण चांगले आहे, पण त्यांच्या पक्षाला मात्र कोकणातील वातावरण अजिबात पोषक ठरणार नाही. भविष्यात सुद्धा हे वातावरण त्यांना पोषक ठरणार नाही, असा टोला खासदार विनायक राऊत यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या कोकण दौऱ्यावरून लगावला आहे.