रत्नागिरी - जोरदार इनकमिंगमुळे भाजप बॅकफुटवर गेल्याचे विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्यावर शिवसेना खासदार विनाय राऊत यांनी त्यांना टोला लगावला आहे. ते म्हणाले मेगाभारतीबाबत चंद्रकांत दादा बोलले ते खरंच आहे, भाजपने त्याचा धडा घ्यावा! रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
चंद्रकांत दादा बोलले ते खरंच, भाजपने त्याचा धडा घ्यावा - विनायक राऊत
जोरदार इनकमिंगमुळे भाजप बॅकफुटवर गेल्याच्या भाजप प्रदेशाध्यक्षांच्या विधानावर खासदार विनायक राऊत यांनी त्यांना लक्ष्य केले आहे.
जोरदार इनकमिंगमुळे भाजप बॅकफुटवर गेल्याच्या भाजप प्रदेशाध्यक्षांच्या विधानावर टोला लगावत खासदार विनायक राऊत यांनी भाजपला सल्ला दिला आहे. जो येईल त्याला प्रवेश दिल्याने भाजपची आज ही अवस्था झाली आहे. भाजपमध्ये आलेल्यांचेच लांगूल चालन जास्त झाले. मात्र, खडसेंसारख्या निष्ठावंताना डावलले जात होते. त्याचा विपरीत परिणाम भाजपला भोगावा लागला. त्यामुळे मेगा भरती किती करायची याचे निर्बंध असणे आवश्यक होते, असे सांगायला खासदार विनायक राऊत चुकले नाहीत. महाराष्ट्राच्या बाबतीत केंद्रसरकार दुजाभाव करत आहे. अजूनही ११ हजार कोटी केंद्राकडून महाराष्ट्राला येणे असल्याचेही खासदार विनायक राऊत यांनी म्हटले आहे.