रत्नागिरी -राजकारणातली भविष्यवाणी करण्याचा ठेका फक्त नारायणराव राणे ( Minister Narayan Rane ) यांनीच घेतला आहे. त्यांची प्रत्येकवेळची भविष्यवाणी ही हवेवरची वाणी ठरलेली आहे. त्यामुळे असल्या भविष्यवाणीला आम्ही काडीचीही किंमत देत नाही, अशी टीका खासदार विनायक राऊत ( MP Vinayak Raut ) यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर केली आहे. ते आज रात्री रत्नागिरीत बोलत होते.
'राजकारणातील भविष्यवाणी करण्याचा ठेका फक्त नारायण राणे यांनीच घेतलाय' - खासदार विनायक राऊत - महाविकास आघाडी
राजकारणातली भविष्यवाणी करण्याचा ठेका फक्त नारायणराव राणे यांनीच घेतला आहे. त्यांची प्रत्येकवेळची भविष्यवाणी ही हवेवरची वाणी ठरलेली आहे. त्यामुळे असल्या भविष्यवाणीला आम्ही काडीचीही किंमत देत नाही, अशी टीका खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर केली आहे. ते आज रात्री रत्नागिरीत बोलत होते.
खासदार विनायक राऊत
त्यांचं हे दिवास्वप्नच ठरेल -
खासदार राऊत म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray ) यांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगल्या प्रकारे चाललेलं महाविकास आघाडीचं ( Mahavikas Aaghadi ) सरकार पाच वर्षाची कारकीर्द यशस्वीपणे पार पाडेल. कोणी कितीही भविष्यवाणी करो त्यांचं ते दिवास्वप्नच ठरेल, असे म्हणत खासदार विनायक राऊत यांनी राणे यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली आहे.