रत्नागिरी - माझ्या ५ वर्षाच्या कार्यकाळात मी अनेक लोकाभिमुख कामे केली. असे असतानाही ज्यांच्या डोक्यात विकृती त्यांनी माझ्यावर आरोप केला. मला लोक ओळखतात. मी कोकणभूमिची सेवा करताना निष्कलंक वृत्तीने काम केल्याचे महायुतीचे उमेदवार विनायक राऊत यांनी सांगितले.
मी निष्कलंक; डोक्यात विकृती असणाऱ्यांनीच माझ्यावर आरोप केले - विनायक राऊत
काँग्रसेच्या राजवटीमधील प्रलंबित प्रश्न १०० टक्के सोडवले. मागील वर्षात मुंबई-गोवा महामार्गाचा प्रश्न मार्गी लावला, असे विनायक राऊत म्हणाले.
राऊत म्हणाले, काँग्रसेच्या राजवटीमधील प्रलंबित प्रश्न १०० टक्के सोडवले. मागील वर्षात मुंबई-गोवा महामार्गाचा प्रश्न मार्गी लावला. अशी विकासात्मक कामे घेऊन लोकांपुढे जात आहे. राष्ट्रीय हित म्हणून सेना भाजप-युती झाली आहे. आमच्या विरोधात असणाऱया सर्वांची डिपॉझिट जप्त होणार आहेत.
रत्नागिरीमध्ये रोजगार निर्मिती, पाटबंधारे प्रकल्प उभारणे, विमानतळाच्या कामाला चालना देणे यासाठी प्रयत्न करणार आहे. सिंधुदुर्ग प्रणाणे स्वदेश दर्शन योजनेत रत्नागिरीचा समावेश होण्यासाठी पुढाकार घेणार आहे. यासोबतच १२ महिने पर्यटक यावेत यासाठी दळणवळणाची साधने पुरवणार असल्याचे राऊत म्हणाले.