महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

खचलेल्या कशेडी घाटाची खासदार सुनिल तटकरेंकडून पाहणी - MP Sunil Tatkare ratnagiri

सध्या कशेडी घाटात खचलेल्या रस्त्यावर एका मार्गावर भराव टाकून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तर दुसरीकडे या ठिकाणी पूल बांधण्याचा प्रस्ताव तयार करण्याच्या खा.तटकरेंकडून सूचना देण्यात आल्या आहेत. तर या रस्त्याला लागून असलेल्या मोठ्या दरडींच्या मागून मार्ग काढता येईल का, या संदर्भात विचार करण्याच्या सूचना देखील खासदार सुनिल तटकरे यांनी दिल्या आहेत.

खचलेल्या कशेडी घाटाची खासदार तटकरेंंकडून पाहणी

By

Published : Aug 17, 2019, 6:07 PM IST

रत्नागिरी- कोकणातील महत्वाचा सण म्हणजे गणेशोत्सव. त्यामुळे मुंबई-पुण्यातून दरवर्षी लाखो चाकरमानी आपल्या गावी गणेशोत्सवासाठी येत असतात. यावेळी प्रवासासाठी चाकरमान्यांची संपूर्ण मदार मुंबई-गोवा महामार्गावरच असते. मात्र, गेल्या दोन महिन्यात या अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या, तर अनेक ठिकाणी रस्ता खचला आहे. त्यामुळे आगामी गणेशोत्सवाच्या दृष्टीने आज खासदार सुनिल तटकरे यांनी कशेडी घाटाची पाहणी केली आहे.

खचलेल्या कशेडी घाटाची खासदार तटकरेंंकडून पाहणी करण्यात आली

कशेडी घाटात भोगाव इथे १०० मीटर परिसरातील रस्ता दोन ते चार फुटाने खचला आहे. सध्या या ठिकाणी काम सुरू असून रस्ता सुस्थितीत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे इथली वाहतूक सध्या एकेरी सुरू आहे. या कामाचा आढावा घेण्यासाठी आज खासदार सुनिल तटकरे यांनी या घाटाची पाहणी केली आहे.

सध्या कशेडी घाटात खचलेल्या रस्त्याच्या एका मार्गावर भराव टाकून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तर दुसरीकडे या ठिकाणी पूल बांधण्याचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना खा. तटकरे यांनी दिल्या आहेत. तर या रस्त्याला लागून असलेल्या मोठ्या दरडींच्या मागून मार्ग काढता येईल का, या संदर्भात विचार करण्याच्या सूचना देखील खासदार सुनिल तटकरे यांनी दिल्या आहेत.

त्याचबरोबर तटकरे यांनी या भागाचा भूगर्भीय तज्ञांकडून सर्व्हे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याबाबत अधिक माहिती देण्यासाठी खासदार सुनिल तटकरे यांच्याशी रत्नागिरीचे 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी संवाद साधला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details