रत्नागिरी -मुंबई-गोवा महामार्गावरील तळगाव ते जानवली या भागात लवकर टोल लावू नका अशी मागणी शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे आपण ही मागणी केल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
प्रतिक्रिया - शिवसेना खासदार विनायक राऊत खा. राऊत यांची मंत्री गडकरींकडे मागणी -
याबाबत बोलताना खासदार विनायक राऊत म्हणाले की, मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामातील पॅकेज नंबर 9 म्हणजेच तळगाव ते सिंधुदुर्गच्या बॉर्डरमधील जानवलीपर्यंतचा भाग. या भागाचे चौपदरीकरण पूर्ण झाले आहे. मात्र या भागात 3 ते 4 ठिकाणी डॅमेजेस झालेली आहेत. त्याशिवाय इथे प्रोटेक्शन वाॅल पुन्हा बांधण्याची आवश्यकता आहे. ब्रीजवरच्या कामात देखील टेक्निकल मिस्टेक आहेत. त्यामुळे या भागामध्ये लवकर टोल लावू नका. अशी विनंती आपण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना केल्याचे राऊत यांनी यावेळी सांगितले.
नवीन ठेकेदार देण्याची मागणी -
दरम्यान, पाली ते लांजापर्यंतचा जो रस्ता आहे तो देखील रखडलेला आहे. नवीन दिलेला ठेकेदारही अपयशी ठरताना दिसत आहे. म्हणून या सर्व ठिकाणी चांगले दर्जेदार ठेकेदार देण्याची आवश्यकता आहे. यासाठी आपला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे. पुढच्या आठवड्यात त्यांची आपण भेट घेणार असल्याचे खासदार राऊत यांनी यावेळी सांगितले. दरम्यान चिपळूणमधील वाशिष्ठी पुलावरील एक लेन लवकरात लवकर चालू करण्यासाठी आमचे प्रयत्न असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा - मुंबई-गोवा महामार्गावर चिखलाचे साम्राज्य; चार तास वाहतूक ठप्प