महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उलट्या काळजाच्या आईनेच केली चिमुरडीची हत्या - रत्नागिरी मुलीची हत्या न्यूज

अनैतिक संबधातून जन्माला आलेल्या मुलीची हत्या केल्याची घटना काही दिवसांपूर्वी रत्नागिरीमध्ये घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी आईला अटक केली आहे.

मुलीची हत्या
मुलीची हत्या

By

Published : Jan 17, 2020, 5:19 PM IST

रत्नागिरी - अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या मुलीची क्रूरपणे हत्या करणाऱ्या आईला पोलिसांनी अटक केली आहे. 22 दिवसांच्या तपासानंतर आरोपी आईला अटक करण्यात पोलिसांना यश आले. एक स्त्री अर्भक खाडीलगत मृतावस्थेत सापडल्याची तक्रार 22 डिसेंबरला जयगड पोलीस ठाण्यात आली होती.

आईनेच केली चिमुरडीची हत्या


अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या मुलीचे आईने अगोदर तोंड दाबले. नंतर या मुलीला काहीवेळ शौचालयातील पाण्याच्या बादलीत उलटे लटकवत ठेवले. मुलगी मृत झाल्याची खात्री झाल्यानंतर तिला खाडी किनारच्या खाजणात सोडून दिले. रत्नागिरी पोलिसांनी वेगाने या प्रकरणाचा तपास करून आरोपी आईला अटक केली. अनैतिक संबंधातून तिने कृत्य केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.

हेही वाचा - डीएसके ठेवीदाराची आत्महत्या; पैसे परत मिळत नसल्याने रिक्षाचालकाचा गळफास

आरोपी महिलेला अगोदर एक मुलगी आहे. मात्र, तिने केलेल्या कृत्यानंतर तिला आई म्हणावे की, नाही हा प्रश्न उपस्थित होत आहे

ABOUT THE AUTHOR

...view details