महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चिपळूणमध्ये गोवंश हत्येचे सत्र सुरूच; पिंपळी येथे 4 ते 5 गोवंश जनावरांची कत्तल - चिपळूणमध्ये गोवंश हत्या

चिपळूणमध्ये हा प्रकार वारंवार होत असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. चिपळूणच्या नागरिकांनी संयम राखावा आणि या प्रकाराबाबत कुणाला काही माहिती मिळाल्यास पोलिसांशी संपर्क साधावा जेणेकरून तपासकार्य करण्यास आणखी मदत होईल, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे यांनी केले आहे.

पिंपळी येथे  4 ते 5 गोवंश जनावरांची कत्तल
पिंपळी येथे 4 ते 5 गोवंश जनावरांची कत्तल

By

Published : Jan 22, 2020, 1:10 PM IST

रत्नागिरी - चिपळूण तालुक्यात पुन्हा गोवंश हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. गेल्या आठवड्यात कामथे येथे असाच प्रकार घडला होता. काल(21 जानेवारी) कराड रोड लगत पिंपळी येथे नदीकिनारी काळकाई मंदिर परिसरात 4 ते 5 गोवंश जनावरांची कत्तल केल्याची घटना समोर आली आहे. एकाच महिन्यात ही दुसरी घटना असल्याने परिसरात तणाव निर्माण झाला आहे.

चिपळूणमध्ये गोवंश हत्येचे सत्र सुरूच

हेही वाचा -चिपळूण तालुक्यातील कामथे गावात गोवंश हत्या झाल्याचा ग्रामस्थांचा संशय

गेल्यावर्षी खेड तालुक्यातील लोटे येथे असाच प्रकार घडल्यामुळे जाळपोळ झाली होती. चिपळूणमध्ये हा प्रकार वारंवार होत असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. चिपळूणच्या नागरिकांनी संयम राखावा आणि या प्रकाराबाबत कुणाला काही माहिती मिळाल्यास पोलिसांशी संपर्क साधावा जेणेकरून तपासकार्य करण्यास आणखी मदत होईल, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details